अहमदनगरचे नाव बदलून अंबिकानगर करा; मनसेने केली मागणी

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यावरुन चर्चा सुरु आहे. असे असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अहमदनगरच्या स्थापनादिनी अहमगनगरचे नाव अंबिकानगर करुन बारसे घातले आहे.

तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शहराचे नाव अंबिकानगर करण्यात यावे,अशी मागणी करत कायनेटीक चौक येथील सर्कलला नामांतरणाचे फलक लावून आंदोलन केले आहे.

आजपासून संभाजीनगरच्या नामांतरणाचा विषय मार्गी लावणार आहे. यापुर्वीपासून आम्ही या शहराचे नाव अंबिकानगर करण्यात यावे, अशी मागणी करत होतो. आज आम्ही फक्त चौकामध्ये नामांतरणाचे फलक लावले, काही दिवसांनंतर ते प्रत्येक ठिकाणी दिसतील, असे सुमित वर्मा यांनी म्हटले आहे.

तसेच औरंगाबादच्या नामांतरणासाठीही मनसे विद्यार्थी सेनेतर्फे अहमदनगरमध्ये आंदोलन केले होते. पण आता नगरचे अंबिकानगर करावे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही सुमित वर्मा यांनी म्हटले आहे. तसेच सोशल मीडियावर नामांतरणाच्या सोहळ्याचा व्हिडिओही पोस्ट करण्यात आला आहे.

या नामकरणाबाबात मनसे लवकरच कोर्टात धाव घेणार आहे. लॉकडाऊननंतर पक्षाचे प्रमुख राज ठाकरे, बाबासाहेब पुरंदरे यांना भेटून ही चळवळ व्यापक करणार असल्याचेही सुमित वर्मा यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबदचे नामांतरण संभाजीनगर आणि अहमदनगरचे अंबिकानगर करा, असे सांगितले होते. तसेच यासाठी बाळासाहेबांनी १९९५ मध्ये सभाही घेतली होती. त्यावेळी त्यांनी अहमदनगरचे नाव अंबिकानगर केले होते.

केडगाव उपनगरामध्ये अंबिका देवी आहे. तिचेही पौराणिक महत्व आहे. त्यामुळे आम्ही देवीच्या नावावरुण मागणी लावून घरली आहे, असे ही सुमित वर्मा यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

जाणून घ्या ‘ऊपर आका नीचे काका’ म्हणीचे रहस्य; काकांच्या नावाने भिक मागायचे भिकारी
संसदेत जेव्हा मोदी सरकार १०२ वी घटनादुरूस्ती करत होते तेव्हा संभाजीराजेंनी तोंड का उघडले नाही?
‘इंडियाज बेस्ट डान्सर २’ चे ऑडिशन सुरु; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया? मोबाईलवरूनही…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.