असे काय झाले की, जिगरी यार मनोजकुमार आणि प्राणची मैत्री तुटली

बॉलीवूडमधील अनेक जोड्या मोठ्या पडद्यावर सुपरहिट आहेत. अभिनेते असो किंवा अभिनेत्री चित्रपटातील जोडी प्रेक्षकांना खऱ्या आयुष्यात देखील तेवढीच आवडते. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अशा एक नाही तर अनेक जोड्या आहेत.

इंडस्ट्रीतील काही जोड्या खुप प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले असते. पण काही काळाने ही जोडी तुटते. अशीच एक जोडी म्हणजे मनोजकुमार आणि अभिनेते प्राण यांची. दोघांनी एकत्र चित्रपट केला तर तो चित्रपट नक्कीच हिट व्हायचा.

दोघांनी खुप वेळा एकत्र काम केले होते. त्यामुळे दोघांची मैत्री खुपच छान होती. दोघांमधला बॉण्ड खुपच भारी होता. त्यामुळे दिग्दर्शक आणि निर्माते बिनधास्तपणे दोघांना एका चित्रपटात घ्यायचे.

७० आणि ८० च्या दशकामध्ये मनोजकुमार स्टार होते. पण त्यांच्या पेक्षा मोठे स्टार प्राण होते. त्यांनी चित्रपटांमध्ये खलनायकांच्या भुमिका निभावून प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे मनोज कुमार पेक्षा जास्त लोकं त्यांना पसंत करत होते.

त्यामुळे प्राण कोणत्याही चित्रपटामध्ये खलनायक म्हणून असले की, चित्रपट सुपरहिट व्हायचा. ही गोष्ट त्यांना चांगलीच माहिती होती. त्यामूळे त्यांच्या स्वभावात एक वेगळाच रुबाब होता. जो लोकांना आवडायचा.

प्राणची सर्वाधिक प्रसिद्धी होती. अनेक चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केले होते. पण एका चित्रपटाच्या प्राण असे काही बोलले की, ती गोष्ट मनोजकुमारला आवडली नाही आणि त्यांनी प्राणला चित्रपटातून काढून टाकले.

‘दस नंबरी’ चित्रपटामध्ये मनोजकुमार आणि प्राण दोघेही एकत्र काम करत होते. चित्रपटाची शुटींग सुरू झाल्यानंतर प्राणने दिग्दर्शकाकडे जास्त फिसची इच्छा जाहीर केली. त्यांनी सांगितले की, त्यांना मनोजकुमार पेक्षा अधिक फिस हवी. कारण हा चित्रपट त्यांच्या जीवावर हिट होणार आहे.

ही गोष्ट दिग्दर्शकांना मान्य नव्हती. चित्रपटाच्या अभिनेत्यापेक्षा खलनायकाला जास्त पैसे देणे शक्य नाही. असे त्यांनी सांगितले. पण प्राण मात्र ऐकायला तयार नव्हते. त्यांनी सरळ सरळ चित्रपट सोडण्याची धमकी दिली.

काही वेळातच ही गोष्ट मनोजकुमारला समजली. त्यांना ही गोष्ट आवडली नाही. चित्रपट प्राणमूळे नाही तर त्यांच्यामूळे हिट होतो. असे त्यांचे म्हणणे होते. ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी त्यांनी प्राणला चित्रपटातून काढून टाकले आणि दुसऱ्या अभिनेत्याला चित्रपटामध्ये घेतले.

दस नंबरी चित्रपट रिलीजनंतर सुपरहिट झाला. प्राण चित्रपटामध्ये नसले तरी देखील चित्रपट हिट होऊ शकतो. ही गोष्ट मनोजकुमारने सिद्ध करून दाखवली होती. पण या गोष्टीमूळे त्यांची मैत्री मात्र तुटली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

उलट उत्तर देणाऱ्या मिथून चक्रवर्तीचा राजकुमारने असा अपमान केला की, त्यांनी रडायला केली होती सुरुवात

प्रेग्नेंट हेमा मालिनीला अमिताभ बच्चनने दिली होती ‘अशी’ ऑफर की धर्मेंद्रचा राग झाला अनावर

अंकिता लोखंडेने सांगितला कास्टिंग काऊचचा अनूभव; म्हणाली, रूममध्ये नेऊन…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.