Share

Manoj Jarange Patil: अंतरवाली सराटीत पोलिसांकडून झालेली मारहाण देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरुनच; मनोज जरांगे पाटील यांचा दावा

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या कार्यकर्त्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवली सराटी येथील पोलिसांची मारहाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सांगण्यावरूनच झाली, असा थेट आरोप केला आहे. हे आरोप एबीपी माझाशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.

मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले नसते, तर पोलिसांची हिंमत अशा प्रकारे वागण्याची नव्हती. त्यांनी त्यांचे मुद्दे मांडताना सांगितले की, प्रथम आरक्षणासाठी निघालेला जीआर योग्य होता, मात्र अंमलबजावणीत त्यांना फसवणूक झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, “चर्चेत मी सहभागी होणार नाही, मुख्यमंत्र्यांना काय माहित, मात्र मी असे म्हणालो नाही की चर्चेला नकार द्यावा” असेही ते म्हणाले. ते म्हणाले, सरकारने मुंबईत येण्याची वेळ येऊ देऊ नये, कारण एकदा मुंबईकडे निघालो की माघार घेणे अशक्य होईल, असा इशारा त्यांनी दिला.

“आम्ही जातीवादी नाही” – मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची आवश्यकता आहे का? या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले की, हे सरकारच्या विचारावर आहे. ते म्हणाले, “आम्ही जातीवादी नाही. आम्ही कधीही मंडल कमिशन न दिलेल्या आरक्षणावर काही बोललो नाही, तर मग आमच्याच आरक्षणाला विरोध का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“अंतरवलीत झालेली चूक पुन्हा करू नका” 

अंतरवली सराटी येथील चुकांना आवाहन करत मनोज जरांगे पाटील म्हणाले, “जर तुम्ही पुन्हा अशी भानगड केली, तर त्याची किंमत तुम्हाला आणि पंतप्रधानांना देखील भोगावी लागेल. आम्ही एकदा संघर्ष केला, अजूनही आमच्या अंगातल्या गोळ्या बाहेर आल्या नाहीत.” त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक स्पष्ट इशारा देताना सांगितले की, “तुम्ही मराठ्यांच्या नादी लागण्याची गरज नाही. जो काही करायचं ते करा, मात्र या भानगडीत पुन्हा पडू नका.”

29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. 29 ऑगस्ट रोजी ते मुंबईत धडकणार आहेत, आणि हे आंदोलन निर्णायक ठरणार आहे, असा ठाम निर्धार त्यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “आमच्या संघर्षाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे.”

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now