मनोज बाजपेयीचे झाले आहेत दोन लग्न; दुसरी बायको आहे प्रसिद्ध अभिनेत्री

बॉलीवूडचे प्रभावशाली अभिनेते मनोज बायपेयीने काही दिवसांपूर्वीच त्यांचा ५२ वा वाढदिवस साजरी केला आहे. त्यांचा जन्म बिहारच्या एका छोट्या गावात झाला होता आणि आज इंडस्ट्रीतील सर्वात मोठे स्टार आहेत. त्यांचा प्रवास बघून अनेकांना प्रेरणा मिळते.

मनोजकडे पाहून असे वाटते की, तुम्ही मेहनत करत राहीलात तर तुम्हाला नक्कीच यश मिळते. त्यांनी शुल, झुबेदा, पिंजर, अक्स अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करुन आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. एवढेच नाही तर मनोजने त्यांच्या दमदार अभिनयासाठी तीन वेळा नॅशनल अवॉर्ड जिंकले आहेत.

दमदार अभिनयाच्या जोरावर आज मनोज इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहेत. आज त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांचा अभिनय त्यांची ओळख बनली आहे. मनोज बाजपेयी त्यांच्या वैयक्तिक आयूष्यामूळे देखील नेहमीच चर्चेत असतात.

खुप कमी लोकांना माहीती असेल की, मनोजने दोन लग्न केली होती. त्यांच्या पहील्या लग्नाबद्दल लोकांना माहीती नाही. त्यांनी दुसरे लग्न एका बॉलीवूड अभिनेत्रीसोबत केले होते. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या पहील्या पत्नीबद्दल सांगणार आहोत.

मनोज बाजपेयीने करिअरच्या सुरुवातीला दिल्लीच्या एका मुलीशी पहीले लग्न केले होते. पण त्यांचे हे लग्न फक्त दोन महीने टिकू शकले. दोन महिन्यांमध्येच दोघेही वेगळे झाले आणि त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर मनोज खुप दुखी होते.

याच कालावधीमध्ये त्यांची भेट बॉलीवूड अभिनेत्री शबाना रजा म्हणजे नेहासोबत झाली. शबाना देखील बॉलीवूड अभिनेत्री आहे. तिने करिब चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. याच चित्रपटासाठी शबानाने तिचे नाव नेहा केले होते.

मनोज आणि नेहाची पहीली भेट १९९८ मध्ये झाली होती. पण दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर व्हायला अनेक वर्ष लागली. २००६ मध्ये नेहा आणि मनोजने लग्न केले. लग्नानंतर नेहाने अभिनयाला रामराम ठोकला. आत्ता ती कुटूंबाकडे लक्ष देत आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे.

महत्वाच्या बातम्या –

पतीच्या निधनानंतर एकट्या पडल्या आहेत विजेता पंडित; झाली आहे ‘अशी’ अवस्था

शाहरूख खानला वाटत होते; राम मंदिराची पायाभरणी मुस्लिमांनी, तर मशिदीची हिंदुंनी करावी
…म्हणून बायको ऐश्वर्याला ऑनस्क्रीन किस करत नाही अभिषेक बच्चन
विनोद खन्नासोबत रोमँटिक सीन द्यायला घाबरायच्या अभिनेत्री; कारण ऐकून धक्का बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.