मनोज बाजपेयीला नीच म्हणणाऱ्या सुनील पालला मनोज बाजपेयीचे सनसनीत उत्तर; म्हणाला, त्याच्या…

प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल चांगलाच चर्चेत आला आहे. कारण सुनील पालने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपायीवर टीका केली होती. त्याने मनोज बायपेयीला नीच माणूस म्हटले आहे या टीकेमुळे लोकांनी त्याला चांगलेच ट्रोल केले होते.

सध्या राज कुंद्राचे पॉर्नोग्राफी प्रकरणची देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. या प्रकरणावर अनेक कलाकार प्रतिक्रिया देत आहे. याप्रकरणी कॉमेडियन सुनील पालनेही यावर प्रतिक्रिया दिली होती.

डिजिटल प्लॅटफोर्मवर बनलेले कंटेन्ट फॅमिलीसोबत बघता येत नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मला सेन्सरशिप नसल्यामुळे लोक त्याचा फायदा उचलत आहे. मनोज बाजपेयीची फॅमिली मॅन पण पॉर्न कंटेन्टमध्ये येते. मनोजला कितीही अवॉर्ड मिळाले असतील, तो कितीही मोठा अभिनेता असेल, पण तो एक उद्धट आणि नीच माणूस आहे, असे सुनील पालने म्हटले आहे.

आता मनोज बाजपेयीने सुनील पालच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुनीलच्या वक्तव्यावर जेव्हा मनोज बाजपेयीला विचारण्यात आले तेव्हा मनोज बायपेयी हसायला लागला. मी त्या लोकांची स्थिती समजू शकतो, त्यांना मेडिटेशनची गरज आहे, असे मनोज बाजपेयीने म्हटले आहे.

मनोजने हिंदूस्तान टाईम्सला एक मुलाखत दिली आहे. त्यावेळी त्याने सुनील पालच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी समजू शकतो की लोकांकडे काम नाहीये. मी त्यांना पुर्णपणे समजू शकतो. कारण मी पण त्या स्थितीतून गेलो आहे. अशा स्थितीत मेडिटेशन करण्याची गरज आहे, असे मनोज बाजपेयीने म्हटले आहे.

दरम्यान, मनोज बायपेयी फॅमिली मॅन २ च्या सिजनमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. लोकांनी या वेबसिरिजला तुफान प्रतिसाद दिला होता. त्यानंतर मनोज बाजपेयी नेटफ्लिक्सवर आलेल्या रे चित्रपटत दिसून आला होता.

महत्वाच्या बातम्या-

देशातील बँकांमध्ये, विमा कंपन्यांमध्ये ५० हजार कोटी पडून, लोक पैसे जमा करून विसरले
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत या सिरीजमध्ये झळकणार मराठमोळी सई ताम्हणकर, चाहते झाले खुश
उद्धव ठाकरेंनी सांगितले फडणवीसांसोबत पाहणी करण्याचे कारण; म्हणाले, सकाळी मला असे समजले की..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.