धक्कादायक! मुंबईत आमदाराच्या पत्नीचा ब्रीजवर चढून आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई | मुंबई शहरातील मानखुर्द येथील ब्रीजवर एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. आत्महत्या करणारी महिला आमदाराची पत्नी असल्याचे माहिती मिळाली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मानखुर्द पोलीस वाहतुकीचे नियोजन करत असताना एका दुचाकी चालकाने महिला ब्रीजवर चढली असून ती रडत असल्याची माहिती दिली. यानंतर पोलीस कॉन्स्टेबल ढगे यांना तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले.

पोलीस कॉन्स्टेबल ढगे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत महिलेसोबत चर्चा करुन त्यांना समजावले. महिलेला समजावत आत्महत्या करण्यापासून रोखले. यानंतर महिलेला मानखुर्द पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथे महिलेने आपण आमदाराची पत्नी असल्याचे सांगितले.

कौटुंबिक वादामुळे आपण तणावात होतो. त्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे महिलेने सांगितले. महिलेला नंतर नवी मुंबई पोलिसांकडे सोपवण्यात आले. महिलेच्या कुटुंबाशी संपर्क साधत पोलिसांकडून त्यांना संपुर्ण घटनाक्रम सांगण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-
आईची माया! ऑक्सिजनवर असलेली ती माऊली करतेय स्वयंपाक; फोटो पाहून तुम्ही कराल कौतूक
VIDEO: कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी डॉक्टरांनी गायलं सुशांतचं गाणं; कोरोना रुग्णही मनसोक्त थिरकले
आनंद महिंद्रांनी शेअर केला एका आगाऊ बाळाचा व्हिडिओ; म्हणाले, हे बाळ…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.