बॉलीवूडचे ‘हे’ सात कलाकार गोत्यात! ड्रग्ज पार्टी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. तसेच न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून तिला ‘न्यायालयीन कोठडी’ सुनावली आहे. अमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला.

तसेच चौकशीदरम्यान रियाने याबाबत काही नावांचा देखील खुलासा केला होता. मात्र ती नावे अद्याप गुपित ठेवण्यात आले आहेत. याचप्रमाणे ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी आता बॉलिवूडमधील काही दिग्गज अडकण्याची शक्यता आहे.

याचे कारण असे की, शिरोमणी अकाली दल प्रमुख मनजिंदर सिंह सिरसा यांनी बॉलिवूड मधील सात कलाकारांविरुद्ध गु.न्हा दाखल केला आहे. यामध्ये करण जोहर, मलाइका अरोरा, दीपिका पदुकोन, अर्जुन कपूर, शाहीद कपूर, विकी कौशल आणि वरून धवनसह इतरही काही कलाकारांची नावे घेतली आहेत.

यामुळे आता बॉलिवूड चांगलेच ह्दारले आहे. तसेच मनजिंदर सिंह सिरसा यांनी एका जुन्या पार्टीच्या व्हिडीओचा आधार घेत हा गु.न्हा दाखल केला आहे. या पार्टीमध्ये ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला होता, असा गंभीर आरोप मनजिंदर सिंह यांनी केला आहे.

दरम्यान, याबाबत मनजिंदर सिंह यांनी या ट्वीटसोबत काही कागदपत्रही सादर केली आहेत. मनजिंदर सिंह यांनी या ट्वीटसोबत काही कागदपत्रही सादर केली आहेत. यामुळे आता सुशांत सिंग राजपूत प्रकरणामुळे अशा अनेक धक्कादायक माहिती समोर येताना पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
स्वतःचे शेत आहे पण शेतात जाण्यासाठी रस्ता नाही? मग ‘असा’ करा शेतरस्त्यासाठी अर्ज
या झाडाच्या देखभालीचा खर्च आहे १५ लाख आणि २४ तास कडक पहारा; काय खास आहे या झाडामध्ये?सुशांत आणि रियाचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल; समोर आले ‘ते’ कृत्य

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.