…म्हणून मनीषा कोईरालाने सुपरहिट चित्रपट ‘जुबेदा’ला दिला होता नकार

करिश्मा कपूर ९० च्या दशकातील प्रत्येकाची आवडती अभिनेत्री होती. वयाच्या फक्त १५ व्या वर्षी करिश्माने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. ‘प्रेम कैदी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर करिश्माने परत कधी मागे वळून पाहीले नाही. तिने एका पेक्षा एक हिट चित्रपटामध्ये काम केले.

१९९६ मध्ये रिलीज झालेल्या ‘राजा हिंदूस्थानी’ चित्रपटातून करिश्माला खरी ओळख मिळाली होती. या चित्रपटाने तिच्या करिअरला वेगळेच वळण दिले. याच चित्रपटासाठी तिला पहील्यांदा सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता. त्यानंतर ती रातोरात स्टार बनली.

करिश्माने अनेक हिट चित्रपट दिले. पण करिअरमधील सर्वात महत्वाचा चित्रपट ठरला तो म्हणजे ‘जुबेदा’. या चित्रपटाला २० वर्ष पुर्ण झाली आहेत. पण तरीही तिने हा चित्रपट आणि करिश्माचा अभिनय कोणीही विसरु शकले नाही. आजही लोकं या चित्रपटाची आठवण काढतात.

जुबेदा चित्रपटात करिश्मा कपूरसोबतच मनोज बाजपेयी आणि रेखाने देखील महत्वाच्या भुमिका निभावल्या होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. पण खुप कमी लोकांना ही गोष्ट माहीती असेल की, करिश्मा या चित्रपटासाठी दिग्दर्शकांची पहीली पसंत नव्हती.

करिश्माच्या अगोदर मनीषा कोईरालाला या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. पण तिने हा चित्रपट करायला नकार दिला. जुबेदा चित्रपटातील भुमिकेसाठी मनीषा कोईराला दिग्दर्शकांची पहीली पसंत होती. त्यांचे हे स्वप्न पुर्ण होऊ शकले नाही. कारण मनीषाने चित्रपटाला नकार दिला.

मनीषाने नकार दिल्यानंतर या चित्रपटाची ऑफर करिश्मा कपूरला देण्यात आली. दिग्दर्शक श्याम बेगलने करिश्माला चित्रपटासाठी निवडले होते. पण त्यांनी करिश्माचा एकही चित्रपट पाहीला नव्हता. तरीही त्यांना करिश्मावर विश्वास होता. म्हणून या भुमिकेसाठी त्यांनी तिची निवड केली.

एका मुलाखतीमध्ये श्माय बेगल यांनी जुबेदा चित्रपटाबद्दल सांगितले की, ‘चित्रपटासाठी माझी पहीली पसंत करिश्मा नव्हती. पण दुसरी पसंत मात्र ती होती. मला वाटले की, करिश्मा ही भुमिका खुप उत्तम पद्धतीने निभावू शकते. कारण ती खुप मेहनती होती. जी गोष्ट माझ्यासाठी खुप महत्वाची होती. त्यासोबतच ती एका फिल्मी कुटूंबातील होती. म्हणून मी तिला चित्रपट ऑफर केला होता’.

त्यांनी पुढे सांगितले की, ‘करिश्मासोबत शुटींग करताना खुप चांगला अनूभव आला. तिच्यासाठी ही भुमिका नवीन होती. पण तरीही तिने अतिशय उत्तम पद्धतीने ती भुमिका निभावली. त्यामूळे मला तिच्यासोबत काम करताना कोणतीही अडचण आली नाही आणि ही चित्रपट हिट झाला’.

महत्वाच्या बातम्या –
टेलिव्हिजनवरील ब्यूटी क्वीन शिवांगी जोशी आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण; पहा तिच्या घराचे फोटो
अभिनेत्री नुसरत भरुचाने अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर मिळवले आहे यश; आहे करोडोंची मालकिण
गीता कपूरने खरच गुपचूप लग्न केले का? स्वत: गीतानेच केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, सत्य..
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने वाढदिवसाच्या दिवशी उरकले लग्न, पहा लग्नाचे सुंदर फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.