११ अफेअर्सनंतर २०१० मध्ये मनीषा कोईरालाने केले होते नेपाली बिजनेस मॅनसोबत लग्न; दोन वर्षात झाले वेगळे

९० च्या दशकात सुंदरता आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर मनीषा कोईराला बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री बनली होती. सौदागर चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या मनीषाने अनेक सुपरहिट चित्रपट केले. पण मनीषा सर्वाधिक चर्चेत होती ती म्हणजे तिच्या लव्ह अफेअर्समूळे.

अनेकांच्या मनावर राज्य करणारी मनीषा खऱ्या आयूष्यात एकदा नाही तर अनेकदा प्रेमात पडली होती. पहील्या चित्रपटापासूनच मनीषाच्या अफेअर्सची चर्चा सुरु झाली होती. अभिनेत्यांसोबतच बिजनेस मॅन आणि राजकारणी लोकांसोबत मनीषाचे नाव जोडले गेले होते. जाणून घेऊया मनीषा कोईरालाच्या लव्ह अफेअर्सबद्दल.

१ विवेक मुशराम – सुभाष घईच्या सौदागर चित्रपटातून विवेक मुशराम आणि मनीषा कोईरालाने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. पहील्याच चित्रपटाच्या सेटवर मनीषा तिच्या कोस्टारच्या प्रेमात पडली होती. खुप कमी वेळात दोघांचे अफेअर सुरु झाले आणि तेवढ्या लवकर दोघांचे ब्रेकअप झाले. चित्रपटाच्या रिलीजनंतर हे दोन्ही कलाकार वेगळे झाले.

२ नाना पाटेकर – मनीषाचे सर्वाधिक चर्चित अफेअर अभिनेता नाना पाटेकरसोबत होते. मनीषा विवाहीत नाना पाटेकरच्या प्रेमात पागल झाली होती. अनेकदा रात्री उशिरा नाना आणि मनीषाला एकत्र पाहिले जायचे. मनीषाने नानासोबत लग्नाचा निर्णय घेतला होता. पण त्यांचे नाव आयशा झुल्कासोबत जोडले गेले. त्यामूळे मनीषाने नाना पाटेकरसोबत ब्रेकअप केले.

३ डीजे हुसैन – नाना पाटेकरसोबत ब्रेकअपनंतर मनीषा डीजे हुसैनच्या प्रेमात पडली होती. बॉलीवूडच्या एका पार्टीमध्ये दोघांची भेट झाली होती. असे बोलले जाते की, हुसैनने मनीषाला लग्नासाठी प्रपोज केले होते. पण लग्नापासून दुर पळणाऱ्या मनीषाने त्यासोबत ब्रेकअप करत लग्नाला नकार दिला होता.

४ आर्यन वैद – ‘मार्केट’ चित्रपटाच्या शुटींग वेळी मनीषाचे नाव अभिनेता आर्यन वैदसोबत जोडले गेले. दोघेही चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि प्रेमात पडले. आर्यनने प्रसिद्धीसाठी या रिलेशनशिपचा वापर केला. ही गोष्ट मनीषाला समजताच तिने ब्रेकअप केले आणि आयूष्यात पुढे निघाली. मनीषासोबत ब्रेकअपनंतर आर्यन वैदचे करिअर संपले होते.

५ प्रशांत चौधरी – मुंबईमधील प्रसिद्ध बिजनेस मॅन प्रशांतला मनीषाने परफेक्ट जीवनसाथी सांगितले होते. दोघे लग्नही करणार होते. पण परिवाराच्या दबावामूळे प्रशांतने मनीषासोबत ब्रेकअप केले. मनीषाचे हे नातेही जास्त काळ टिकू शकले नाही. या वेळेसही मनीषाचे लग्नाचे स्वप्न अपूर्ण राहिले.

६ क्रिसपीन कॉनरॉय – नेपाळमध्ये ऑस्ट्रेलियन राजदूत क्रिसपीन कॉनरॉयसोबत देखील मनीषाचे नाव जोडले गेले होते. मनीषाचे कुटूंब राजकारणात मोठ्या सक्रिय आहे. त्यामूळे एका राजदूतासोबत तिचे नाव जोडल्या गेल्यामूळे कुटूंबला आवडले नव्हते. याच कारणामूळे मनीषाची ही लव्ह स्टोरी पुढे जाऊ शकली नाही.

७ राजीव मुलचंदानी – मॉडेलिंगच्या दुनियेतील प्रसिद्ध चेहरा म्हणून राजीव मुलचंदानीला ओळखले जाते. मनीषाच्या अगोदर राजीव ऐश्वर्या रायसोबत रिलेशनशिपमध्ये होता. ऐश्वर्यासोबत ब्रेकअपनंतर राजीवने मनीषाला डेट करायला सुरुवात केली. पण नेहमीप्रमाणेच हे नाते देखील जास्त काळ टिकू शकले नाही.

मनीषाच्या कोईरालाच्या बॉयफ्रेंड्सची लिस्ट खुप आहे. अनेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या मनीषाने २०१० मध्ये नेपाली बिजनेस मॅन सम्राट दहलसोबत लग्न केले. पण हे जास्त काळ टिकू शकले नाही. दोन वर्षांनी दोघे वेगळे झाले. सध्या मनीषा सिंगल आहे आणि बॉलीवूडमध्ये कमबॅक करत आहे.

महत्वाच्या बातम्या –
आयूष्यभर भाड्याच्या घरात राहत होत्या प्रसिद्ध अभिनेत्री दिना पाठक; टेलरसोबत केले होते लग्न
एका चुकीमूळे हिरो बनू शकले नाहीत प्रेम चोप्रा; आजही करतात पश्चाताप
कतरिना कॅफने सलमान खानकडे केली होती जॉन इब्राहिमची तक्रार; त्यानंतर आजपर्यंत जॉनसोबत बोलत नाही सलमान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.