Share

या’ राज्यात महाविकासआघाडीचा प्रयोग; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-एनपीपी एकत्र

Rahul-NPP.j

मणिपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मणिपूरमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार सारखा प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मणिपूरमध्ये काँग्रेस(Congress) आणि एनपीपी(NPP) हे पक्ष एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार असण्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस आणि एनपीपी हे पक्ष एकत्र मणिपूरमध्ये सत्ता स्थापन करणार आहेत.(manipur mahvikas aghadi pattern for bjp )

मणिपूरमध्ये 60 जागांसाठी  दोन टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. त्या सर्व जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत झाली होती. सध्या मणिपूरमध्ये भाजपाची सरशी होताना दिसून येत आहे.

मणिपूरमध्ये भाजपाने तब्बल २५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने १३ जागांवर आघाडी घेतली आहे. मणिपूरमध्ये एनपीएफने ६ जागांवर आणि एनपीपीने १० जागांवर आघाडी घेतली आहे. इतर पक्षांनी ६ जागांवर आघाडी घेतली आहे. मणिपूरमध्ये ६० विधानसभा जागांपैकी ३१ जागा जिंकणं बहुमतासाठी आवश्यक आहे.

भाजप सध्या आघाडीवर आहे. भाजपला बहुमतासाठी ६ जागांची आवश्यकता आहे. मणिपूरमध्ये भाजपने हालचाली करण्यापूर्वीच काँग्रेसने एनपीपी पक्षाबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी हातमिळवणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस आणि एनपीपी हे पक्ष एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा प्रयोग मणिपूरमध्ये देखील राबविला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली होती. या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवत महाविकास आघाडीचे सरकार आणले होते.

मणिपूरमध्ये २८ फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले होते. यामध्ये अनेक मतदान केंद्रांवर बूथ कॅप्चरिंग आणि ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचे आरोप काँग्रेसने केले होते. या प्रकाराची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. यावर निवडणूक आयोगाने अनेक मतदान केंद्रांवर पुन्हा निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते.

महत्वाच्या बातम्या :-
गोव्यातील शिवसेनेची स्थिती पाहून सोमय्यांचा राऊतांना चिमटा, म्हणाले, ‘गोव्यात शिवसेना कुठं आहे?’
योगी आदित्यनाथांचा जलवा; तब्बल ४५ वर्षांनंतर पहिल्यांदाच केला ‘हा’ विक्रम
देवेंद्र फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बार फुसका? राष्ट्रवादी काँग्रेसने केला मोठा खुलासा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now