महाराष्ट्रात मिळवलेल्या यशानंतर शिवसेना(Shivsena) पक्षाने देशभरात विस्तार करण्याचे ठरवले आहे. यासाठी शिवसेनेने गोवा(Goa), उत्तरप्रदेश(Uttar Pradesh) आणि मणिपूर राज्यातील निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. काही दिवसांमध्ये मणिपूर राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. मणिपूर राज्याची जबाबदारी पक्षाने खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर सोपविली आहे.(manipur bjp ex chief ninister son enter in shivsena party)
सलग चार वेळा खासदार राहणाऱ्या शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का दिला आहे. मणिपूर राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि भाजपचे विद्यमान आमदार आर. के. सिंग यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना पक्षाची मणिपूर राज्यात चर्चा रंगू लागली आहे.
मणिपूर राज्यात शिवसेना पक्ष नऊ जागा लढवणार आहे. विधानसभेच्या निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे नुकतेच मणिपूर राज्यातील इंफाळमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पक्षाचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात भगवा ध्वज फडकवत निवडणुकांच्या प्रचाराला सुरवात केली.
मणिपूरमध्ये शिवसेना पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजप पक्षामधील काही नेते, पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजप पक्षाचे आमदार थांगझलम हाओकिप, असेम बाबू सिंग यांनी चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी थांगझलम हाओकिप आणि असेम बाबू सिंग यांना शिवबंधन बांधले.
मणिपूर राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलगा आर. के. सिंग यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राज्यात पक्षाची ताकद वाढली आहे. मणिपूर राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांसाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे स्थानिकांच्या मदतीने गावोगावी प्रचार करत आहेत. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे गावोगावी जाऊन सभा, कॉर्नर बैठका घेत आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर मणिपूर निवडणुकांची जबाबदारी सोपविली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे इंफाळ येथील गावागावात भेटी देऊन शिवसेना पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. यावेळी शिवसेनेचे उमेदवार कोनसा मिशेल आणि महिला आघाडीच्या मनोरमा देवी आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :-
VIDEO: प्रविण तरडेंचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मुळशी पॅटर्न स्टाईलने सल्ला, म्हणाले..
राफेलचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर: भारतापेक्षा कमी खर्चात इंडोनेशियाने विकत घेतली ४२ राफेल विमानं
मुलगी झाल्याचा आनंद गगणात मावेना, शेतकऱ्याने पुर्ण गावात वाटली तब्बल दीड क्विंटल जिलेबी