Share

Manikrao Kokate : “राजीनामा देईन, पण…”, ‘रमी’ प्रकरणात माणिकराव कोकाटेंची खुली कबुली, विरोधकांवरही केली टीका

Manikrao Kokate : शेतकऱ्यांचं भवितव्य धोक्यात, उन्हाळ्यात पीक सुकतंय, अन् कृषीमंत्री मात्र मोबाइलवर रमी खेळतायत? असा संतापजनक प्रकार समोर येताच साऱ्या राज्यात खळबळ माजली. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Sharad Pawar faction) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी थेट व्हिडीओ ट्विट करून हा प्रकार उघड केला. त्यामुळे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) चांगलेच अडचणीत सापडले. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली, अन् अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर दबाव आला की, ‘या’ कृषीमंत्र्याचा पत्ता कट करणार का?

या पार्श्वभूमीवर कोकाटेंनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट सांगितलं – “मी रमी खेळत नाही, खेळता देखील येत नाही. ऑनलाईन रमीसाठी बँक खाते जोडावं लागतं, पण माझं कोणतंही खाते तसं जोडलेलं नाही.” एवढंच नाही, तर कोकाटेंनी हे आरोप करणाऱ्या नेत्यांना कोर्टात खेचण्याचा इशाराही दिला.

कोकाटेंचं स्पष्टीकरण

कोकाटे म्हणाले, “मी त्या दिवशी विधानसभेत होतो, माझ्याकडं स्वतःचा मोबाइल नव्हता. मी माझ्या ओएसडीकडून माहिती मागवण्यासाठी मोबाइल घेतला होता. त्या मोबाइलवर गेमचा पॉप-अप येत होता, आणि तो स्कीप करायला मला वेळ लागला. तो गेम मी खेळलेला नाही, आणि व्हिडीओमध्ये फक्त 11 सेकंदाचाच भाग दाखवला गेला. जर पूर्ण व्हिडीओ दाखवला असता, तर सत्य समोर आलं असतं.”

दोषी सापडलो, तर थेट राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईन!

कोकाटेंनी मोठं विधान करत सांगितलं “मी आता मुख्यमंत्री (Chief Minister), उपमुख्यमंत्री (Deputy CM), सभापती आणि अध्यक्ष यांना पत्र देणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. जर मी ऑनलाईन रमी खेळताना दोषी आढळलो, तर मी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात कोणालाही न भेटता थेट राज्यपालांकडे (Governor) जाऊन माझा राजीनामा देईन.”

कोकाटे यांनी जोरात सांगितलं की, हे आरोप केवळ बदनामीसाठीच आहेत. “मी एक रुपयाचीही रमी खेळलेली नाही. आरोप करणाऱ्यांनी माझं नाव समाजात खराब केलं आहे, म्हणून मी त्यांच्यावर कोर्टात कारवाई करणार.”

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now