फळांचा राजा आंबा; जाणून घ्या आंब्यापासून आइस्क्रीम बनवण्याची सोपी पद्धत

उन्हाळ्यात फळांची नाव घेतली की लगेच आंबा आठवतो. आंबा हा फळांचा राजा आहे. उन्हाळ्याच्या काळात आंबा सर्वत्र उपलब्ध असतो. बरेच लोक वर्षभर या फळाची चव घेण्यासाठी प्रतीक्षा करतात. आंब्याचे  पापड, आंब्याचा शर्बत, मॅंगो शेक असे अनेक स्वादिष्ट पदार्थही आंब्यापासून बनवता येतात.

तुम्ही कधी घरी ताज्या, रसाळ आंब्यापासून मॅंगो आईस्क्रीम बनवली आहे का? नसेल तर आज आम्ही  तुमच्यासाठी मॅंगो आइसक्रीमची रेसिपी घेऊन आलो आहोत. ही आईस्क्रीम तुम्ही  कधीही खाऊ शकता. रात्रीच्या जेवणानंतर  मिष्टान्न म्हणून देखील सर्व्ह करू शकता.

आंबा आईस्क्रीमसाठी साहित्य-

दूध – 2 कप
मलई – 3 कप
योग्य आंबा (रस ) – २ कप
आंबा (कापलेला) – 2 कप
कस्टर्ड पावडर – 2 चमचे
व्हॅनिला सार – 1 चमचा
साखर – 2 कप

आंबा आईस्क्रीम कशी  बनवायची –
आंबा आईस्क्रीम तयार करण्यासाठी १/४  कप दुधामध्ये कस्टर्ड मिसळा आणि बाजूला ठेवा. यानंतर उरलेले दूध आणि साखर एकत्र गरम करा. साखरेला दुधात पूर्णपणे विरघळून त्याला  उकळी येऊ द्या. ते उकळण्यास सुरवात झाल्यावर कस्टर्ड मिश्रण घालून परत उकळा.

एक मिनिट मंद आचेवर शिजू द्या आणि मग गॅस बंद करा. आता हे थंड होऊ द्या. नंतर त्यात आंब्याचा रस, आंब्याचे तुकडे, मलई आणि व्हॅनिला  घाला. त्याला  चांगले मिक्स करा आणि एका घट्ट झाकणाच्या भांड्यात ठेवा.

–  ते मिश्रण पूर्णपणे सेट करण्यासाठी थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर हे बाहेर काढा आणि हँड ब्लेंडरच्या मदतीने फेटून घ्या आणि परत फ्रीजमध्ये ठेवा.

– कंटेनरचे झाकण घट्ट बंद करायला विसरू नका. मोजक्या वेळेसाठी ते मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा ,त्यावर बर्फाचा थर साचू नये याची काळजी घ्या. काही काळानंतर तुमची आंबा आइस्क्रीम तयार होईल. अशी आइस्क्रीम  जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला आवडते.

हे ही वाचा –

जाणून घ्या कोणत्या जातीच्या तांदळात आहे कर्करोगाशी लढण्याची क्षमता

पोलार्डच्या वादळात चेन्नई भूईसपाट; मुंबईच्या वाघाने चेन्नईच्या तोंडातील विजय खेचून आणला

लष्करातील मेजर ते प्रसिद्ध अभिनेते असा झंझावाती प्रवास करणारे विक्रमजीत कंवरपालांचे कोरोनाने निधन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.