आम्ही लोककलावंत आहोत ही आमची चूक आहे का? रघूवीर खेडकर व मंगला बनसोडे ढसाढसा रडल्या

मुंबई : ज्या तमाशा कलावंतांनी लोककला काळजापलीकडे जपली, ते तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर आज अक्षरश ढसाढसा रडले. लॉकडाऊनमध्ये झालेली त्यांची हालत ऐकून काळीज पिळवटून जात होतं.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना आम्ही लोककलावंत आहोत ही आमची चूक आहे का? असे म्हणत रघूवीर खेडकर व मंगला बनसोडे अक्षरश ढसाढसा रडले. यावेळी सरकारकडून त्यांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केली.

कोरोनाच्या संकटानंतर झालेल्या लॉकडाऊन काळात तमाशा कलावंतांच्या आयुष्याची झालेली परवड आणि दु:ख त्यांनी रसिकांसमोर  मांडले. लॉकडाऊनकाळात समाजातील अनेक घटकांना सरकारने मदत केली. मात्र, अद्याप तमाशा कलावंतांना कोणतीही मदत न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

रघूवीर खेडकर म्हणतात की मी उपोषण केलं होतं. त्यानंतर सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी फोन करुन बोलावून घेतलं. आम्ही तिथं गेल्यानंतर अमित देशमुख यांनी सांगितलं की आम्ही फुल ना फुलाची पाकळीची मदत करू असं त्यांनी आश्वासन दिलं. मात्र, त्यानंतर पुन्हा तीन महिने काहीच नाही.

त्यानंतर, चित्रपटगृह, नाटकं, लावणीचे कार्यक्रम, आठवडी बाजार, असं सर्वकाही सुरु झालं. तमाशा मात्र अजूनही बंदच आहे, अशा शब्दात  रघुवीर खेकडर यांनी आपली व्यथा मांडली.

ज्या लोककलावंतांना स्टेजवर अनेकदा वन्स मोर दिला जायचा. आज त्याच कलावंतांना एकवेळ जेवणासाठी पडेल ते काम करावं लागत असल्याचे दुःख मंगला बनसोडे यांनी सांगितले. अनेक कलावंतांना नेसण्यासाठी साडी सुद्धा नसल्याचही त्यांनी सांगीतले. अ

नेक कलाकार उपाशी मरत आहेत तर काही सेंट्रींग, बिगारी कामावर जात आहेत. रघूवीर खेडकर यांनी तर पोटासाठी घरातला बंबसुद्धा विकला. अशाप्रकारे घरातली भांडी विकायची वेळ त्यांच्यावर आलीय.

शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात अशा सर्व राजकीय नेत्यांकडे गेलो. मात्र, या सर्वांकडून पाच रुपयेही मदत मिळाली नसल्याचे मंगला बनसोडे म्हणाल्या. या कोरोनामुळे अनेक तमाशे बंद झाले.

तमाशा गावागावातील जत्रा, यात्रांवर चालतो. मात्र, कोरोनामुळे यावर निर्बंध आल्याने तमाशा पूर्णपणे बंद आहे. आम्ही या संदर्भात शरद पवार यांच्याकडे गेलो ते म्हणाले आम्ही मदत केली. पण, ती आमच्यापर्यंत पोहचलीच नाही.

महराष्ट्रात लहान-मोठे असे शंभराच्यावर तमाशा मंडळे असतील अशी माहिती रघुवीर खेडकर यांनी दिली. तिकीटावरही तमाशा करणेही परवडत नाही. पूर्वी दीड ते दोन हजार प्रेक्षक यायचे मात्र, आता पाचशे ते सहाशे प्रेक्षक येत असल्याने ते परवडत नाही असे खेडकर यांनी सांगितले.

आजकाल मोबाईल, टिव्हीवर सर्व उपलब्ध असल्याने प्रेक्षक तमाशा बघायला येत नसल्याची खंत रघूवीर खेडकर यांनी व्यक्त केली. आजकाल युट्युबवर सर्व तमाशा सर्च केला तर सगळ्यांचे तमाशे उपलब्ध होत असल्यानेही प्रेक्षक कमी झाल्याचे खेडकर यांनी सांगितले. लॉकडाऊन काळात तमाशा बंद झाल्याने त्या तीन महिन्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये मदत आम्ही सरकारकडे मागितली आहे. पण, ती अद्याप मिळाली नाही. अशी खंत रघूवीर खेडकर यांनी व्यक्त केली

लॉकडाऊनकाळात अनेकांना सरकारकडून मदत झाली. मात्र, तमाशा कलावंताना अजूनही मदत झाली नाही. या कलावंतांना महाराष्ट्रातील जनतेने मदत करण्याची गरज आहे. त्यांना होईल तितकी मदत करावी असे आवाहन आम्ही करतो आहोत.
Mangla Bansode, Raghuvir Khedkar, Tamasha

हे ही वाचा
मोठी बातमी: राज्यात कुठल्याही क्षणी लॉकडाऊन होणार? सरकारचा निर्णय झाल्यात जमा
महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, ज्याने लॉकडाऊन काळात लोकांना एका पैशाची मदत केली नाही – फडणवीस
तर राज्यात लॉकडाऊन लागणार – उद्धव ठाकरे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.