Share

मॅनेजमेंट मुंबई संघावर नाराज, ‘या’ बड्या खेळाडूसह चार खेळाडूंची करणार संघातून हकालपट्टी

आयपीएल २०२२ च्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी फारशी चांगली नाही. या हंगामात मुंबई इंडियन्स संघ पॉइंट टेबलमध्ये सर्वात शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे. आयपीएल २०२२ च्या पहिल्या आठ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) संघाला सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे.(mangement angry on mumbai indians player)

सलग आठ सामन्यांत एखाद्या संघाला पराभव स्विकारावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाच वेळा आयपीएल स्पर्धेचा विजेता असणाऱ्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वाईट कामगिरी केली आहे. त्यामुळे मॅनेजमेंट मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर मॅनेजमेंट विचार करत असल्याची माहिती मिळत आहे. आयपीएलच्या पुढील हंगामात मुंबई इंडियन्स संघामध्ये मोठा बदल केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी आपलं मतं व्यक्त केलं आहे. आयपीएलच्या पुढील हंगामात मुंबई इंडियन्स संघ कायरन पोलार्डला रिलीज करेल, असा दावा आकाश चोप्रा यांनी केला आहे.

मुंबई इंडियन्सचा खेळाडू असलेल्या कायरन पोलार्डने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केली नाही. या संपूर्ण हंगामातील सामन्यांमध्ये त्याला केवळ १४४ धावा करता आल्या. कायरन पोलार्डला मुंबई इंडियन्सने रिटेन केले होते. कायरन पोलार्डसह सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या चार खेळाडूंना मुंबई इंडियन्स संघाने रिटेन केले होते.

माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा म्हणाला की, “आपण कदाचित कायरन पोलार्डचा शेवटचा सीझन पाहिला आहे. जर कायरन पोलार्डला रिलीज केले. तर मुंबई इंडियन्स संघाचे ६ कोटी रुपये फ्री होतील. याशिवाय मुंबई इंडियन्स संघाकडून मुरुगन अश्विन (१.६ कोटी), टायमल मिल्स (१.५कोटी) आणि जयदेव उनाडकट (१.३ कोटी) या खेळाडूंना रिलीज केले जाऊ शकते.

३५ वर्षीय कायरन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती पत्करली आहे. सध्या त्याला खराब फॉर्मशी सामना करावा लागत आहे. यापूर्वीच्या आयपीएल हंगामात कायरन पोलार्डने चांगली कामगिरी केली आहे आणि मुंबई इंडियन्स संघाला सामने जिंकून दिले आहेत. पण आयपीएलच्या पुढच्या हंगामात कायरन पोलार्ड दिसणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
रुपाली पाटलांची चंद्रकांत पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, केली मुंडकं छाटण्याची भाषा, म्हणाल्या..
कोहली महान खेळाडू, लोक त्याला विनाकारण ट्रोल करतात; पाकिस्तानी खेळाडूचा कोहलीला जाहीर पाठिंबा
शोएब अख्तरही झाला DK चा फॅन, म्हणाला, त्याच्या वैयक्तिक जिवनात अनेक अडचणी आल्या पण…

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now