मनसेमधील आऊटगोईंग थांबेना! बड्या नेत्याने केला भाजपात प्रवेश

मुंबई | येत्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत मनसेला धक्के बसत आहेत. मनसेच्या राजेश कदम यांनी शिवसेनेत, तर आज मनसेचे नगरसेवक आणि गटनेते मंदार हळबेंनी भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे मनसेला मोठे खिंडार पडले आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. सोमवारीच डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आज मनसेला दुसरा धक्का बसला आहे.

दरम्यान, मनसेला लागलेल्या या गळतीनंतर मनसेचे काही प्रमुख नेते कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. कल्याण ग्रामीणचे आमदार राजु पाटील, नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत.

मनसेच्या आऊटगोईंगवर बाळा नांदगावकर म्हणतात..
मनसेच्या राजेश कदम यांनी शिवसेनेत, तर मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मनसेमध्ये खळबळ उडाली आहे. मनसेमध्ये मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरू असून, ते रोखण्याचं पक्ष नेत्यांपुढे आव्हान आहे.

याबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना विचारले असता. ते म्हणाले, ”काहींनी पक्ष सोडल्यानं पक्षाला काही फरक पडत नाही. जुने गेले तर नवे कार्यकर्ते उभारी घेतील. सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही”, असे म्हणत मनसेतून बाहेर पडणाऱ्यांवर  नांदगावकर यांनी हल्लाबोल केला.

महत्त्वाच्या बातम्या
शिवसेनेच्या ढाण्या वाघाची दिल्लीत डरकाळी; संजय राऊत पोहचले गाझीपूर बॉर्डरवर
लोकल सेवेच्या वेळापत्रकात होणार बदल? राजेश टोपेंनी केली मोठी घोषणा
कंगणा राणावत हाजीर हो; ‘या’प्रकरणात पुन्हा अडकली वादाची राणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.