मानसीने शेअर केला लग्नसोहळ्याचा संपूर्ण व्हिडीओ; मेहंदीपासून संगीतपर्यंत ‘अशी’ केली धमाल

मुंबई | मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिचा नुकताच विवाह सोहळा पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नृत्यांगना व अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. तिचा विवाह १९ जानेवारी २०२१ रोजी प्रदीप खरेरा याच्यासोबत झाला होता.

मानसी आणि प्रदिपच्या लग्न सोहळ्याची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली होती. प्रदीप खरेरा एक आंतरराष्ट्रीय बॉक्सर आहे. मानसी नाईकने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक हिट गाणी दिली आहेत. हे दोघेही लग्नाच्या आधी बरेच महिने एकमेकांच्य प्रेमात होते.

नुकताच मानसीने या लग्नसोहळ्याचा एक टीझर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओमध्ये तिच्या लग्नसोहळ्यातील प्रत्येक विधींवर, कार्यक्रमांवर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे. यात मानसीच्या मेहंदीपासून ते संगीतपर्यंत आणि हळदीपासून ते पाठवणीपर्यंत प्रत्येक गोष्ट या व्हिडीओत दिसून येत आहे.

मानसीचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मिडीयावर घालतोय धुमाकूळ…

नुकताच मानसीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ फरीदाबादचा आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ससुराल हो तो ऐसा..दुल्हन वही अच्छी जो पिया मन भाये, ससुराल वही अच्छी जहाँ मायके की याद न आये…लव्ह यू इंडिया. ये भारत की बेटी है, दोनो मेरे अपने है..माझा महाराष्ट्र आणि खूप प्रेम माझ्या हरियाणाला.

महत्त्वाच्या बातम्या
भाजपाची रणरागिणी कडाडली, “वाट कसली बघताय, मंत्री संजय राठोडांच्या मुसक्या आवळा”
‘मला नवऱ्याकडे जायचंय’; असं म्हणत नवऱ्यासाठी ढसाढसा रडू लागली चिमुरडी; पहा व्हिडीओ
नाथाभाऊ गरजले; ‘ईडी लावली तर, सीडी लावेन असं गमतीनं म्हटलेलं, पण…’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.