Share

Manasi Naik Ex Husband Pardeep Kharera Second Marriage : दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला मानसी नाईकचा Ex-नवरा; अभिनेत्री बायको विशाखाला ओळखलंत? लग्नाचे फोटो व्हायरल

Manasi Naik Ex Husband Pardeep Kharera Second Marriage : मनोरंजन विश्वात एक नवीच चर्चा रंगली आहे. अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) हिचा पूर्वाश्रमीचा जोडीदार आणि बॉक्सर प्रदीप खरेरा (Pardeep Kharera) पुन्हा एकदा लग्नाच्या गोड सोहळ्यात सामील झाला आहे. 27 नोव्हेंबर रोजी प्रदीपने अभिनेत्री विशाखा पनवर (Vishakha Panwar ) हिच्यासोबत सात फेरे घेतले आणि नवीन आयुष्याची सुरुवात केली. सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ बघता, हा सोहळा थाटामाटात पार पडल्याचं स्पष्टपणे जाणवतं आहे.

मानसी नाईकसोबतचा संसार अल्पावधीत मोडल्यानंतर काही काळातच प्रदीप आणि विशाखा यांच्यात जवळीक वाढली. त्यांच्या ओळखीचं नातं साखरपुड्यापर्यंत पोहोचलं आणि आता एका वर्षानंतर दोघांनी लग्नगाठही बांधली. मनोरंजनप्रेमींमध्ये या विवाहाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

घटस्फोटानंतर लगेचच साखरपुडा

मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचं लग्न लॉकडाऊन काळात धुमधडाक्यात झालं होतं. मात्र हे नातं काही काळ टिकूनच दोघांनी आपापल्या वाटा वेगळ्या केल्या. त्यानंतर प्रदीप पुन्हा एकदा प्रेमात पडला आणि काही दिवसातच त्याचा विशाखासोबत साखरपुडा झाल्याची माहिती समोर आली.

हळद–मेहंदीपासून विवाहापर्यंत सगळंच थाटात

प्रदीपच्या दुसऱ्या लग्नाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू होती. हळद, मेहंदी, संगीत—सगळे समारंभ पारंपरिक आणि दिमाखात पार पडले. लग्नाच्या दिवशी दोघांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत विधीवत सात फेरे घेतले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतो आहे.

विशाखा पनवर कोण आहे?

प्रदीपची पत्नी विशाखा पनवर हीसुद्धा अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. तिने आपल्या इंस्टाग्रामवर जिओ हॉटस्टारवरील गेम ऑफ ग्लोरी या वेब शोमध्ये भूमिका केल्याचा उल्लेख केला आहे. तिच्या ग्लॅमरस लूक आणि अभिनयामुळे ती सोशल मीडियावर लोकप्रिय आहे.

लग्नानंतर प्रदीपने आपल्या पत्नीवर नोटा ओवाळून टाकतानाचा एक व्हिडिओ शेअर करत “लव्ह यू लाडो” असे कॅप्शन दिली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून चाहत्यांकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now