मानलं बुवा! इस्त्रायलमधील कैद्यांचा आगळावेगळा प्रताप; चमचाने बोगदा खाणुन तुरूंगातून काढला पळ

जेरुसलेम। आपल्या आयुष्यातील काही गोष्टी अशा असतात ज्या आपण कधी प्रत्येक्षात करू शकत नाही किंवा काही गोष्टी कधी घडूच शकत नाहीत. मात्र अशा गोष्टी आपण चित्रपटात काल्पनिक स्वरूपात पाहत असतो. चित्रपट वेगवेगळे स्टंट, किंवा वेगवेगळ्या घडामोडी, कहाण्या पाहतो.

मात्र सध्या इस्त्रायलमध्ये अशी एक घटना घडलीय जी आपण हॉलीवूडमधील श्वाशंक रिडेम्प्शन नावाचा एव्हरग्रीन नावाच्या चित्रपटात पाहिले आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नेमकी घटना काय आहे?

तर घटना अशी आहे की इस्त्रायलमध्ये चित्रपटात दाखवल्याप्रमाणे सहा कैद्यांनी गंजलेल्या चमच्यांच्या सहाय्याने या कैद्यांनी तुरुंगात बोगदा खणला आणि कुणालाही समजायच्या आत पळुन जाण्यात यश मिळवलं.हे सर्व कैदी दहशतवादी गटाशी संबंधित आहेत.

कैद्यांनी केलेल्या पराक्रमानंतर सर्वांनाच धक्का बसला असून सर्वजण हैराण झाले आहेत. व आता या सहा कैद्यांचा शोध सुरु आहे. उत्तर इस्त्रायलचे गिलबोआ हे तुरुंगातील हा सर्व प्रकार आहे. गिलबोआ हे तुरुंग सर्वात सुरक्षित तुरुंग मानलं जातं.

या तुरुंगात अनेक कुख्यात गूंड आणि पॅलेस्टिनी दहशतवादी शिक्षा भोगत आहेत. मात्र जेरुसलेम या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या सहा कैद्यांनी गंजलेल्या चमच्यांच्या सहाय्याने तुरुंगातच भुयार खोदलं. व त्यासाठी त्यांनी भन्नाट कल्पना केली होती.

या कैद्यांमध्ये एक कैदी हा ‘अल अक्सा’ या पॅलेस्टिनी दहशतवादी गटाचा नेता असुन इतर पाच कैदी हे गाझा पट्टीतील इस्लामिक जिहादी गटाचे सदस्य आहेत. या सहा जणांनी प्लॅन करून चमच्यांच्या सहाय्याने तुरुंगातच भुयार खोदलं.

हे चमचे ते एका पोस्टरच्या मागे लपवुन ठेवायचे आणि कोणी नसताना बाथरुममधील टॉयलेटच्या भांड्याखाली खोदायचे.त्यांचे हे खोदकाम कित्येक महिने सुरु असणार आहे.हे भुयार खोदत-खोदत त्यांनी तुरुंगाच्या बाहेर जाण्याचा मार्ग शोधला आणि ते फरार झाले.

तुरुंगाच्या बाहेर असलेल्या शेतातुन काही लोक पळत असल्याचं तिथल्या शेतकऱ्यांनी तुरुंग प्रशासनाला सांगितलं.त्यानंतर प्रशासनाने तुरुंगातील सर्व कैद्यांची संख्या मोजली,त्यावेळी सहा कैदी कमी असल्याचं समजलं.

मात्र भुयार खोदणं एकट्याच काम नसून या कैद्यांना पळुन जाण्यासाठी आणि भुयार खोदण्यासाठी बाहेरच्या लोकांनी मदत केली असणार असा दावा इस्त्रायलच्या तुरुंग प्रशासनाने केला आहे. व आता या कैद्यांचा शोध सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या
“जाताय तर जा पण जाता जाता १२ आमदारांच्या फाईलवर सही करून जा, तेवढंच पुण्य मिळेल” 
‘पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं’ बाळासाहेब थोरातांचं पहिल्यांदाच खुलं निमंत्रण 
मोठी बातमी; लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर बांधणार हाती घड्याळ; लवकरच करणार पक्षप्रवेश
भारत-इंग्लंडचा शेवटचा कसोटी सामना का रद्द झाला?; दिनेश कार्तिकने सांगितली इन्साईड स्टोरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.