मुलांना शिकवून मोठं बनवण्यासाठी आईवडिल खुप कष्ट घेत असतात. आपल्या मुलांनी शिकून यश मिळावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं. पण खुप कमी मुलं असतात जे आपल्या आईवडिलांचं स्वप्न पुर्ण करत असतात. अशाच एका मुलाची कहाणी आता समोर आली आहे.
मुलाला मोठ्या कष्टाने वाढलेला एक मुलगा आता सिंगापूरमध्ये सेटल झाला आहे. त्यानंतर आता त्याने आपल्या आईला सिंगापूर दाखवले आहे. दत्तात्रय असे त्या मराठी तरुणाचे नाव आहे. त्याने आपल्या आईला सिंगापूरची सैर घडवली आहे. आपल्या आईसोबतचे फोटो त्याने सोशल मीडियावरही शेअर केले आहे.
दत्तात्रयच्या आईने खुप कष्ट घेऊन मुलाला शिकवले होते. तोही सिंगापूरमध्ये चांगली नोकरी शोधून सेटल झाला आहे. त्यानंतर त्याने आपल्या आईला सिंगापूर दाखवलं आहे. तसेच त्याने आपण कुठे काम करतो ते ऑफिस सुद्धा दाखवलं आहे. मुलाची प्रगती पाहून आईचे अश्रूही अनावर झाले होते.
दत्तात्रयने एक खास पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी हा खुप खास क्षण आहे. मला दुखावणारी एकच गोष्ट आहे की माझे वडिल आता नाहीये. त्यांनी पण याचा अनुभव घ्यावा असं मला वाटत होता. मला तर वाटतं प्रत्येक मुलाने आपल्या आईवडिलांनी आपण प्रवास केलेल्या शहरांची, देशांची सैर घडवावी.
माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. त्यांना तुम्ही फिरवलं तर त्यांचा आनंद गगनात मावणार नाही. सिंगापूरला जाण्याआधीच मी हे ठरवलं होतं. ते माझं ध्येय होतं. काल मी माझ्या आईला जगाचा एक सुंदर भाग दाखवण्यासाठी सिंगापूरला आणले. मी तिला माझं ऑफिस आणि शहर दाखवलं.
तिने जो अनुभव घेतला तो शब्दात व्यक्त करणं शक्य नाही. कल्पना करा ज्या महिलेनं आपलं आयुष्य खेड्यात घालवलं. आज ती परदेशात प्रवास करणारी गावातील दुसरी महिला बनली, असे दत्तात्रयने पोस्ट शेअर करताना म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
वर्ल्डकप जिंकल्यावर ढसाढसा रडली शेफाली वर्मा; प्रत्येक भारतीयाला भावूक करेल ‘हा’ व्हिडिओ, पहा काय म्हणाली..
‘हा आमच्या कंपनीवर नाही तर भारतावरचा हल्ला आहे’; अदानींनी हिंडेनबर्गवर केले ‘हे’ गंभीर आरोप
अर्जुन तेंडुलकरचा रणजी ट्रॉफीमध्ये धुमाकूळ, गोलंदाजांची जोरदार धुलाई करत ठोकल्या 223 धावा