फक्त महिलांच्या अंडरवियर चोरायचा हा चोर; घरात सापडल्या ७०० पेक्षा जास्त अंडरवियर

कोणत्याही देशाला तंत्रज्ञानाच्या बाबतीत जपानशी स्पर्धा करणे अवघड आहे. या देशात अन्न वितरणापासून कपडे धुण्यापर्यंत सर्वकाही यंत्रे करू शकतात. त्यांची कॉइन लॉन्ड्रोमेट्स सारखी स्व-सेवा करणारी लाँड्री मशीन कपडे धुवू शकते पण ती मशीन ते चोरी होण्यापासून रोखू शकत नाहीत.

जपानमधील असाच एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने दक्षिणेकडील प्रांतातून कॉइन लॉन्ड्रोमेट्समधून ७०० हून अधिक महिलांचे अंतर्वस्त्र चोरले होते. आता त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली.

पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला तेव्हा ही बाब उघडकीस आली. अबेमा टीव्हीच्या मते, ५६ वर्षीय टेट्सूओ उराटावर २४ ऑगस्ट रोजी कॉइन लॉन्ड्रोमेट्स मशीनमधून २१ वर्षीय विद्यार्थीनीच्या सहा जोड्या अंडरविअर चोरल्याचा आरोप होता.

उराटाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधिकारी त्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. पोलिसांना त्या माणसाच्या घरात ७३० महिलांचे अंतर्वस्त्र सापडले. या सर्वांना ताब्यात घेऊन स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

जपानच्या बेप्पु शहरात संबंधित घटना घडली आहे. पोलीस विभागाच्या प्रवक्त्याने अबेमा टीव्हीला सांगितले की, इतक्या वर्षात त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पँटी जप्त केल्या नाहीत. अंडरवेअर चोरल्याची कबुली दिल्यानंतर उराटाला आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महिलांचे अंडरविअर चोरीची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी जुलै महिन्यात अमेरिकेतील एका पुरुषावर महिलेचे घर फोडून डझनभर अंडरवेअर चोरल्याचा आरोप होता. महिलांच्या घरात शिरल्यानंतर २९ वर्षीय तरुणाने कोणत्याही मौल्यवान वस्तू किंवा पैशांऐवजी त्यांचे अंडरगार्मंट चोरल्या होत्या.

आरोपी व्यक्तीने एका प्रकरणात अंडरविअर, मेकअप किट आणि ब्रशच्या १५ जोड्या, ८ ब्रा, १२ स्विमिंग सूट आणि इतर कपडे चोरले होते. महिलेने पोलिसांना सांगितले होते की, त्या व्यक्तीने तिच्या ६ वर्षांच्या मुलीच्या कपड्यांसह तिचेकपडे चोरले. पोलीस तपासात उघड झाले की आरोपी चोरीसाठी अनेक दिवस महिलांचा पाठलाग करायचा आणि मग तिचे अंडरवियर चोरी करायचा.

महत्वाच्या बातम्या-

‘माझ्या मुलानं मुलींना डेट करावे, ड्रग्स आणि सेक्स या गोष्टी देखील कराव्या’- शाहरुख खान
उकळत्या पाण्यात ध्यान लावून बसला चिमुकला; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
ऑलिंपिक पदक जिंकल्यानंतर १० पटीने महागडे झाले हे खेळाडू, या ब्रॅन्ड्सकडून आली मोठी मागणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.