नशीब चमकलं! ९० पैशांचा चमचा घेऊन ऑनलाईन विकला, किंमत मिळाली २ लाख रुपये

कोणाच्या नशीबाचे तारे कधी चमकतील हे सांगता येत नाही. अनेकदा काही लोकांचे आयुष्य हे काही क्षणात असे बदलते ज्याच्या आपण विचार पण करु शकत नाही. असेच एक उदाहरण आता समोर आले आहे.

संबंधित घटना ही लंडनमध्ये घडली आहे. एका व्यक्तीने रस्त्यावर लागण्याऱ्या मार्केटमधून एक जूना चमचा खरेदी केला होता. हा चमचा फार जूना आणि वाकलेला होता. पण त्या व्यक्तीला हा चमचा खुप खास आहे हे समजले होते.

हा चमचा त्या व्यक्तीने फक्त ९० पैशांमध्ये खरेदी केला, पण जेव्हा हा चमचा त्याने ऑनलाईन विक्रीला टाकला तेव्हा त्याचा अंदाज खरा ठरला. कारण त्या चमच्याची किंमत लाखो रुपयांमध्ये होती.

खरं तर त्या व्यक्तीला या चमच्याची किंमत ५२ हजार रुपये असेल असे वाटले. पण जेव्हा लिलाव करण्यात आला. तेव्हा बोली हळूहळू वाढत गेली. अखेर हा चमचा १ लाख ९७ हजार रुपयांना विकल्या गेला. टॅक्स आणि एक्स्ट्रा चार्जेस जोडून या चमच्याची किंमत २ लाख रुपयांवर गेली.

त्या व्यक्तीने आपली ओळख लपवून ठेवली आहे. पण ज्या कंपनीने लिलाव केला, त्या कंपनीने त्याची स्टोरी शेअर केली आहे. ऑक्शन हाऊसचे अलेक्स यांनी सांगितले की, हा चमचा १३ व्या शतकातील आहे आणि त्याची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. याचा आकार थोडा वाकडा असून याची लांबी ५ इंच आहे.

या चमच्याची डिझाईन रोमन युरोपियन स्टाईलची आहे. असे वाटत होते की हा चमचा अनेक वर्षांपासून पाणी किंवा जमीन खाली दबलेला होता, असे अलेक्स यांनी म्हटले आहे. ती व्यक्ती नेहमीच बुडमार्केटमध्ये जायची असेही अलेक्स यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

विचित्र पण खरे! या विधीनंतर लग्नानंतर तीन दिवस वधू-वराला शौचालयाला जाता येत नाही
भाऊ प्रल्हाद मोदींनी नरेंद्र मोदींचे पितळ पाडले उघडे; म्हणाले ते चहावाले नाहीतच!
धक्कादायक! ओळख ना पाळख, फक्त डोळ्यात डोळे घालून बघितल्यामुळे तरुणाची हत्याराने वार करत हत्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.