याला म्हणतात मैत्री! तरुणाने २३० किलोमीटर गुंडांचा पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला ‘असे’ वाचवले

असे म्हणतात संकट कितीही मोठं असले तरी खरे मित्र संकटात पळून जात नाही, ते कुठल्याही परिस्थितीत आपल्या मित्राला मदत करतात. आता अशाच एका मैत्रीचे जीवंत उदाहरण उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्याच्या बिसंडा गावात दिसून आले आहे.

एका मुस्लिम युवकाच्या मदतीला त्याचा हिंदू मित्र धावून गेला आहे. त्या मित्राणे २३० किलोमीटर कार चालवून गुंडांचा पाठलाग केला आहे आणि मित्राच्या बहिणीला त्या गुंडांपासून वाचवले आहे. त्या गुंडाना झांडी जीआरपीच्या मदतीने अटक करण्यात आली आहे.

मुस्लिम मित्राची बहिण एका मुंबईला जाणाऱ्या रेल्वेत आहे, ही माहिती एक तिसऱ्या मित्राने त्याला दिली होती. तसेच याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला पकडले होते, पण कारवाई न करताच त्याला सोडून देण्यात आले. जेव्हा सोशल मीडियावर ही गोष्ट व्हायरल झाली, त्यानंतर हे सर्वप्रकरण बाहेर आले आहे.

१७ वर्षीय एका मुलीचे एका तरुणाने अपहरण केले होते आणि तिला बांदा रेल्वे स्टेशन इथून तुलसी एक्सप्रेस या रेल्वेमध्ये बसवण्यात आले होते. बहिणी भेटत नसल्याचे एका मुस्लिम मित्राने त्याच्या हिंदू मित्राला सांगितले. त्यानंतर त्या मित्राने तिला शोधण्यास सुरुवात केली.

सगळ्यात आधी ते दोघे रेल्वे स्टेशन गेले. तेव्हा त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचा प्रयत्न केला पण त्यांना तिथल्या पोलिसांनी आणि स्टेशन मास्टरने फुटेज पाहू नाही दिला. तेव्हा त्यांनी एका तिसऱ्या मित्राला फोन लावला आणि तो त्याच तुलसी रेल्वेमध्ये होता.

त्या दोघांनी त्याला तिचा फोटो पाठवला आणि रेल्वेमध्ये शोधण्यास सांगितले. त्याने लगेच शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याला एका बोगीमध्ये चार तरुणांनी घेरलेली एक मुलगी दिसली ती तिच मुलगी होती. त्या मित्राने लगेच त्या दोघांना सांगितले.

त्यानंतर हिंदू मित्राने लगेच आपली कार मागवली आणि त्या रेल्वेचा पाठलाग सुरु केला. त्यानंतर त्यांनी महोबा जीआरपीची पण मदत घेतली. रेल्वे त्या स्टेशनच्या पुढे गेली. त्यानंतर त्यांनी झांसी जीआरपीची मदत घेतली आणि त्यांना बहिणीचा फोटो पाठवला.

त्यानंतर रेल्वे झांसी स्टेशनवर थांबताच त्या बोगीला पोलिसांनी घेरले. तसेच त्यानंतर त्या मुलीला सुरक्षितपणे त्या तरुणांपासून वाचवले. पण तेवढ्यावेळात ते सर्व तरुण पळून गेले होते. पण एक तरुण त्यांना भेटला होता, मात्र त्याच्यावर कारवाई न करताच पोलिसांनी त्याला सोडून दिले.

महत्वाच्या बातम्या-

“सुरुवातीला लोक म्हणायचे, शिवसेना ५-६ महिन्यांत बंद पडेल पण आज…”
शिवसेनेच्या वर्धापनदिनी भन्नाट ऑफर; भाजपचे ओळखपत्र दाखवा अन् पेट्रोल मोफत मिळवा
मोठी बातमी! तीन न्यूज चॅनेल्सना दंड, माफी मागण्याचे निर्देश, तबलिगी प्रकरण आले अंगटल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.