पत्नी कोरोनाची लस घेण्यासाठी जाताच पती चढला झाडावर; कारण वाचून हैराण व्हाल

कोरोनापासून लोकांचा बचाव करण्यासाठी सरकारने शहरी भागांसोबतच ग्रामीण भागांपर्यंत लसीकरणाची मोहिम सुरु केली आहे. लसीकरणाचा चांगला परीणाम दिसून आल्यामुळे लोकांमध्येही याबाबत जागृती निर्माण झालेली आहे.

अनेक ठिकाणी जागृती निर्माण झालेली असली तरी काही ठिकाणी अजूनही लोकांमध्ये गैरसमज आहे. याचा परीणामही बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तर लसीला बघून पळ काढल्याच्याही घटना समोर आल्या आहे. आता अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या राजगडामधून समोर आली आहे.

राजगड जिल्ह्यातील पाटन कला गावातील एक तरुण लसीच्या भितीने चक्क झाडावर चढल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हा युवक तोपर्यंत झाडावरुन खाली उतरला नाही, जोपर्यंत लसीकरण केंद्रावरील लस संपली नाही.

झाडावर चढलेल्या या तरुणाचे नाव कंवरलाल होते. त्याला लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी बोलावले होते. पण तो नकार देत होता. त्याच्या पत्नीला लोकांनी लस घेण्यासाठी तयार केलं आणि ते लसीकरण केंद्रापर्यंत पोहचले.

पत्नीला लस घेण्यासाठी गावकऱ्यांनी तयार केल्याची माहिती त्या तरुणाला कळताच, त्याने पत्नीचे आधारकार्ड घेतले आणि पळून गेला. पण तो फक्त पळाला नाही, तर पुढे जाऊन तो चक्क एका झाडावरच जाऊन बसला.

कंवरलालला असा गैरसमज झाला होता, की लस घेतल्यामुळे ताप येतो आणि नंतर खुप त्रास होतो. याच कारणामुळे त्याने लस घेतली नाही आणि त्याच्या पत्नीलाही लस घेऊ दिली नाही. शेवटी जेव्हा केंद्रावरची लस संपली त्यानंतरच तो तरुण झाडावरुन खाली आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“अनिल देशमुख व अनिल परब केवळ प्यादी, खरे सूत्रधार तर ‘सिल्व्हर ओक’वर आणि ‘वर्षा’वर बसलेत”
अरे बाप रे! काळा चष्मा लावणं नवरदेवाला पडलं महागात; नवरीने मंडपातच मोडलं लग्न
हा साबण आहे का स्टील आहे का दगड? वाचा हे काय आहे आणि लोक याला का विकत घेत आहेत?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.