आयपीएल स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना काल राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या संघादरम्यान खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या बाबतीत ट्विटरवर एक भविष्यवाणी करण्यात आली होती.(Man Prophecy about virat kohli today match)
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन गुजरात टायटन्स(Gujrat Titanse) विरुद्धच्या सामन्यात ४७ धावा करेल, अशी भविष्यवाणी करण्यात आली होती. हा अंदाज खरा ठरला आहे. कारण संजू सॅमसनने कालच्या सामन्यात २६ चेंडूत ४७ धावा केल्या आणि तो बाद झाला. त्यानंतर सोशल मीडियावर भविष्यवाणी संदर्भातील पोस्ट खूप व्हायरल होत आहेत.
बसरानी देव नावाच्या ट्विटर हँडलवरून ही भविष्यवाणी करण्यात आली होती. आता बसरानी देव नावाच्या ट्विटर हँडलवरून बँगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाचा खेळाडू विराट कोहलीच्या बाबतीत भविष्यवाणी करण्यात आली आहे. आज बँगलोर रॉयल चॅलेंजर्स आणि लखनऊ सुपर जायन्ट्स या संघांमध्ये दुसरा क्वालिफायर सामना होणार आहे.
https://twitter.com/MSDIAN___DEV/status/1529100302322118657?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1529100302322118657%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fsports%2Fipl%2Fipl-2022-sanju-samson-will-score-47-runs-against-gujarat-that-person-s-prediction-came-true-now-he-is-talking-about-virat-1062971
या सामन्याच्या संदर्भात बसरानी देव नावाच्या ट्विटर हँडलवरून अंदाज वर्तवण्यात आला आहे. विराट कोहली आजच्या लखनऊ सुपर जायन्ट्स विरुद्धच्या सामन्यात ३० ते ४० धावा करेल, अशी भविष्यवाणी या बसरानी देव नावाच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आली आहे. या ट्विट वर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
https://twitter.com/MSDIAN___DEV/status/1518201591450714113?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1518201591450714113%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fsports%2Fipl%2Fipl-2022-sanju-samson-will-score-47-runs-against-gujarat-that-person-s-prediction-came-true-now-he-is-talking-about-virat-1062971
सध्या सोशल मीडियावर हे ट्विट व्हायरल होत आहे. या ट्विटर हँडलवरून यापूर्वी देखील अनेक अंदाज वर्तविण्यात आले आहेत. केएल राहुलच्या शतकी खेळीपासून ते मार्को यान्सीनच्या बाद होण्यापर्यंत अनेक भविष्यवाण्या बसरानी देव नावाच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आल्या आहेत. आता विराट कोहलीच्या बाबतीत केलेली भविष्यवाणी खरे ठरते का नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/knowMe_0718/status/1529323513793990656?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1529340916649332736%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fsports%2Fipl%2Fipl-2022-sanju-samson-will-score-47-runs-against-gujarat-that-person-s-prediction-came-true-now-he-is-talking-about-virat-1062971
महत्वाच्या बातम्या :-
भारत जगाला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत, मोदी सरकार मोठा निर्णय घेणार?
उमरानचा घातक चेंडू लागला मयंकच्या बरगडीत, जबर जखमी झाल्याने जागेवरच लागला रडू; पहा व्हिडीओ
संभाजीराजे छत्रपतींचा विषय आमच्या दृष्टीनं संपलाय; संजय राऊतांनी खडसावून सांगितलं