एक कोटी झाडांपासून ऑक्सिजन मिळवून देणारा ट्री मॅन, पुर्ण जग त्यांना ठोकतंय सलाम

आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याचे कार्य इतके महान आहे की सात पिढ्यासुद्धा त्यांचे हे कार्य विसरू शकणार नाही. पुर्ण जग त्यांच्या या कार्याला सलाम करत आहे. त्यांचे व्यक्तीमत्त्व खुप मोठे आहे.

विशेष म्हणजे ही व्यक्ती भारतीय आहे. हे आपलं भाग्य आहे की ही व्यक्ती आपल्या भारतात जन्माला आलीये. कारण या माणसाने हजार नाही, दोन हजार नाही तर तब्बल १ कोटी झाडे लावली आहेत. आणि त्यांनी फक्त झाडे लावली नाहीत तर सगळी झाडे जगवली आहेत.

त्यामुळे आज संपुर्ण जग त्यांच्या कार्याला सलाम करत आहे. आम्ही ज्या पर्यावरण प्रेमीबद्दल सांगत आहोत त्यांचे नाव आहे दरीपल्ली रामय्या. जगभरातील पर्यावरण प्रेमी आज त्यांना आपले आदर्श मानतात.

तेलंगणाच्या खम्मम जिल्ह्यात राहणारे रामय्या ८४ वर्षांचे झाले आहेत. त्यांनी आपले सगळे आयुष्य झाडे लावण्यात घालवले आहे. त्यांनी आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त झाडे लावली आहेत. त्यांचे हे कार्य आजही चालू आहे.

ते झाडांचे लहान मुलांसारखे संगोपण करतात. त्यामुळे त्यांना ट्री मॅन ऑफ इंडिया असे नाव पडले आहे. रामय्या यांना त्यांच्या कार्याबद्दल केंद्र सरकारने २०१७ साली पद्मश्री ऑफ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

तसेच त्यांना ऍकेडमी ऑफ युनिव्हर्सल ग्लोबल पीसकडून त्यांना त्यांच्या योगदानाबद्दल डॉक्टरेटची उपाधी देण्यात आली आहे. ते मुळचे तेलंगणातील रेडील्ली गावातील रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या गावातूनच वृक्षलागवडीला सुरूवात केली होती.

त्यांनी आपल्या गावच्या आजूबाजूच्या परिसरात झाडे लावण्यास सुरूवात केली होती. काही दिवसांत गावच्या आजूबाजूच्या भागातील परिसर हिरवागार झाला. मग त्यांनी आजूबाजूच्या गावात झाडे लावण्यास सुरूवात केली.

रामय्या जेव्हा घराच्या बाहेर पडायचे तेव्हा त्यांच्या खिशात वेगवेगळ्या झाडांची बियाणे आणि सायकलवर वेगवेगळ्या प्रकारची रोपे असायची. जिथे मोकळी जागा भेटेल ते झाडे लावायचे. त्यानंतर दररोज त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या झाडांचे संगोपणही केले.

तिथे स्वता जाऊन ते पहाणी करायचे. त्यांना झाडे लावण्याचा इतका छंद होता की त्यांनी बियाणांसाठी आणि रोपे खरेदी करण्यासाठी आपली ३ एकर जमीन विकून टाकली होती. आज आपल्याला ऑक्सीजनची किती गरज आहे याची जाणीव सगळ्यांना झाली असेल.

कोरोना महामारीच्या काळात हे सगळ्यांच्या लक्षात आले असेल. ऑक्सिजनअभावी अनेक रूग्णांचा मृत्यु झाला आहे. अशा परिस्थितीत जी झाडे आज आपल्याला ऑक्सिजन पुरवत आहेत त्यामध्ये रामय्या यांचा खुप मोठा हात आहे.

आज आपण ज्या झाडांचा ऑक्सिजन घेत आहोत त्यापैकी १ कोटी झाडे त्यांनीच लावली आहेत. त्यांच्या या कार्याला सलाम. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडील असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
दोस्तीसाठी कायपण! मित्राच्या आईसाठी ४२० किलोमीटरचा प्रवास करुन फक्त ८ तासात पोचवले रेमडेसिवीर
आजोबांचे वय ८० वर्षे पण छंद तरूण मुलांसारखे, आतापर्यंत खरेदी केल्यात ८० पोर्शे सुपरकार्स
घर विकून सुरू केला ‘हा’ व्यवसाय, आता महिन्याला कमावतात १ कोटी रूपये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.