Homeताज्या बातम्या८६ व्या वर्षी लग्न करत होते वडील, संपत्तीत हिस्सेदार नको म्हणून वडिलांचा...

८६ व्या वर्षी लग्न करत होते वडील, संपत्तीत हिस्सेदार नको म्हणून वडिलांचा घेतला जीव अन्…

पुण्याच्या राजगूरूनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी वधूवर सुचक मंडळात नाव देणाऱ्या वडिलांची आपल्या मुलानेच हत्या केली आहे. या घटनेमुळे राजगुरुनगरमध्ये एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी त्या गुन्हेगाराला ताब्यात घेतले आहे.

वयाच्या ८६ व्या वडिलांनी वधूवर सुचक मंडळात नाव नोंदणी केली होती. याचा राग आल्यामुळे मुलाने वडिलांची हत्या केली आहे. पण त्यामागील खरे कारण ऐकून पोलिसही हादरली आहे. प्रॉपर्टीत वाटेकरुच्या भितीने पोराने बापाला संपवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वडिलांनी दुसरे लग्न केले तर समाजात वावरताना अपमान होईल. शिवाय मालत्तेत हिस्सेदार होईल. या रागाने मुलाने थेट वडिलांच्या गळ्यावर घरातील सुरीने वार केले. पण मृत्यु न झाल्यामुळे मुलाने घरातील वरवंटा डोक्यात घातला आणि वडिलांना संपवलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गुरुवारी हत्यानंतर मुलाने खेड पोलिस ठाण्यात येऊन याबाबत माहिती दिली आहे. तोच फिर्यादी झाला आहे. शंकर रामभाऊ बोऱ्हाडे असे मृत्यु झालेल्या माणसाचे नाव आहे. तर शेखर बोऱ्हाडे हा त्यांचा ४७ वर्षांचा मुलगा असून त्यानेच वडिलांची हत्या केली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच जमिनीच्या वादातून एकाने जन्मदात्या आईची हत्या केली होती. तसेच वडिलांवरही जीवघेणा हल्ला केला होता. संबंधित घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काझड येथे घडला होता. आई वडिल मागितले तितके पैसे देत नाही, या कारणावरुन त्याने हा हल्ला केला होता.

धनकवडीतही असाच एक प्रकार घडला होता. या परिसरातील एका ४२ वर्षीय व्यक्तीने प्लास्टिकच्या पिशवीत डोकं घालून आईचा जीव घेतला होता. गुदमरल्यामुळे महिलेला प्राण गमवावे लागले होते. यानंतर त्यानेही आत्महत्या केली होती.

महत्वाच्या बातम्या-
शिक्षणक्षेत्राला अजून एक कलंक; मुंबईत शैक्षणिक अधिकाऱ्याच्या घरी सापडले कोट्यावधींचे घबाड
फक्त २०० रूपयांची बचत करा आणि तब्बल २८ लाख मिळवून मालामाल व्हा; वाचा LIC च्या भन्नाट योजनेबद्दल..
पोलिस स्टेशनमध्ये फुटला नवऱ्याच्या अश्रूंचा बांध; म्हणाला, “बायको भांडी घासायला लावते आणि..”