माणूस समोर गेला की मनोहरमामा त्याची संपूर्ण माहिती कसं काय सांगायचा? बिंग फुटले

बारामती । समाजात अनेक सुशिक्षित लोक अंधश्रद्धेला अजूनही बळी पडत आहेत. चित्रपटांमध्ये देखील अनेक अशा कथा सांगितल्या जातात. एखादा भोंदू बाबा अंधश्रद्धेच्या नावाखाली प्रचंड लूटमार करत असतो. सध्या याचे उदाहरण देखील समोर आहे. अशाच प्रकारची कथा सोलापूरच्या उंदरगावात सध्या सत्यात आली आहे.

स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवणाऱ्या मन्याचा मनोहर मामा कसा झाला? किंवा जरी आता मनोहर मामा यांच्यांवर कारवाई करण्यात आली असली तरी ते एवढा वर्ष कसे काय लोकांचे खरे नाव व माहिती सांगत होता, याबाबत माहिती समोर आली आहे. समोर बसलेल्यांच्या प्रेयसीचे नावेही तो सहज सांगायचा. आपल्या प्रेयसीचे नाव या महाराजाला कसे काय कळाले, असे समजून समोरचा चकीत व्हायचा.

सध्या सातारा ,सोलापूर, पुणे ग्रामीणमध्ये एकच चर्चा आहे ती म्हणजे मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याची. फसवणूक केल्याप्रकरणी मनोहरमामा भोसले याला बारामती पोलिसांनी साताऱ्यातल्या सालपे डोंगरातून ताब्यात घेतले आहे.

पोलिस कोठडीत असलेल्या मनोहरमामा भोसलेची बुवा होण्यापर्यंतची कहाणी मोठी रंजक आहे. मनोहर मामा भक्ताला त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती सांगत असायचा. ती माहिती तो कोठून कशी मिळवत असे याबद्दल पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली आहे. मनोहर मामा मोबाईल मधील अँप आणि सरकारच्या वेबसाईटच्या माध्यमातून भक्तांच्या घरच्यांबद्दल अधिक माहिती घेत असायचा.

सरकारच्या वेबसाइटवरून लाखो लोकांची माहिती लीक करण्यात मनोहर मामाच्या टोळीचा समावेश आहे. सरकारी अँप माय रेशन नावाच्या अँपमध्ये एका व्यक्तीचा जरी आधार कार्ड नंबर टाकला तरी सर्वांचे नाव त्यात येतात. त्यात नाव आल्यावर घरातल्या सर्वांची माहिती कळत असल्याचे पण दिसून आले आहे.

डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडा बाजारात सुके बोंबील विकून आपली गुजराण करत होता. मात्र, हा मनोहर एक दिवस अचानक गायब झाला. काही वर्षानंतर पुन्हा याच गावात आपण बंगाली विद्या शिकून आल्याचा दावा त्याने केला. त्यानंतर मनोहर मामाच्या अंगात साक्षात बाळूमामा आल्याची घोषणा मनोहर आणि त्याच्या साथीदारांनी केली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.