आश्चर्यकारक! कबूतरांचा सांभाळ करून सांगलीचा हा पठ्या कमावतोय लाखो रूपये

कोण कोणत्या माध्यमातून पैसा कमवेल सांगता येत नाही. हे जग आता बदलच चालले आहे. आता टेलिफोन, मोबाईल आल्यामुळे काही सेकंदात आपला संपर्क कोणाशीही होऊ शकतो. पण आधीच्या काळात कबूतरांद्वारे एकमेकांना संपर्क साधला जात होता. पुर्वी हे कबूतर मोठ्या प्रमाणात पाळले जात होते.

कबूतरे खुप खास असतात त्यामुळे बरेच पक्षीप्रेमी कबूतरांना पाळतात. सांगली जिल्ह्यातील सिकंदर मुल्ला हे अनेक वर्षांपासून आपल्या परिवाराचा वारसा पुढे जोपासत आहेत आणि व्यवसाय करत आहेत.

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण कबूतरांनी सिकंदर मुल्ला यांना लाखो रुपये कमवून दिले आहेत. त्यांच्या या कबूतरांची चर्चा पुर्ण देशभर होत असते. ते निरजमधील नांद्रे येथील रहिवासी आहेत.

त्यांना हा छंद आपल्या वडिलांमुळे म्हणजे चांद मुल्ला यांच्यामुळे लागला होता. त्यांची चौथी पीढी म्हणजे सुरज आणि शकील मुल्ला हे देखील हाच व्यवसाय करत आहेत. ते कबूतरांची निगा राखतात.

त्यांच्याकडे सध्या ६० ते ७० कबूतरे आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विविध स्पर्धांमध्ये मुल्ला यांना कबुतरांनी साडे पाच लाख रुपयांचे बक्षिस मिळवून दिले आहे. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण देशभरात आणि राज्यात कबूतरांची मोठी स्पर्धा भरवण्यात येते.

त्या स्पर्धेत महाराष्ट्रातील कबुतरांनी बाजी मारली आहे. त्यातूनच मुल्ला यांनी लाखो रुपये कमावले आहेत. सर्वात उंच उडण्याचा आणि सर्वात जास्तवेळ आकाशात राहण्याचा विक्रम त्यांच्या कबूतरांच्या नावावर आहे.

त्यांची दोन्ही मुले ही कबूतरांना सांभाळतात. त्यांच्याकडे सहा प्रकारचे कबूतर आहेत. त्यामध्ये कोईमतुर, देशी, खडक, लकी, मद्राशी असे सहा प्रकारचे कबूतरे आहेत. त्यांचा हा व्यवसाय पाहून अनेक लोकांनी कबूतरे पाळली आहेत आणि त्यांनीही या व्यवसायाला सुरूवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या
आश्चर्यकारक! कबूतरांचा सांभाळ करून सांगलीचा हा पठ्या कमावतोय लाखो रूपये
..आणि सलूनवाल्याने पेरला काळा गहू, काढणीच्या आधीच गव्हाला आलीये मोठी मागणी
महाराष्ट्रदिनी राज्याला मिळणार मोफत लसींचं मोठं गिफ्ट; अजित पवारांनी दिले संकेत
जीव गेला तरी बेहत्तर, पण व्यसन जाणार नाही! व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा तंबाखु मळतानाचा विडिओ बघाच

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.