..आणि सलूनवाल्याने पेरला काळा गहू, काढणीच्या आधीच गव्हाला आलीये मोठी मागणी

आम्ही आज अशा शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्याने काळ्या गव्हाची शेती करून पुर्ण पंचक्रोशीक नावलौकिक मिळवला आहे. सलून व्यवसाय करून व आपल्या वडिलोपार्जित शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह होत होता.

तसेच शेतीत वेगवेगळे प्रयोग करणारे युवा शेतकरी म्हणून त्यांची गावात चर्चा होत असे. यंदा त्यांनी असा प्रयोग केला की आता प्रत्येक गावागावात त्यांचीच चर्चा होत आहे. या शेतकऱ्याचे नाव आहे बाबूलाल पगारे.

त्यांचे एक सलून आहे व वडिलोपार्जित दीड एकर शेती आहे. ते सतत शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांनी फेसबूकवर नीलेश शेडगे यांनी केलेल्या काळ्या गव्हाच्या पेरणीची त्यांनी माहिती गोळा केली.

त्यांनी शेडगेंशी संपर्क साधला. त्यांनी पंजाबमधील मोहाली येथील नॅशनल ऍग्री फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटने संशोधित केलेल्या काळ्या गव्हाचे वाण आणून दिले. त्यांनी २ नोव्हेंबर २०२० ला वीस गुंठ्यात सरी वरबा पद्धतीने पेरणी केली होती.

यामध्ये त्यांनी ३५ किलो काळ्या गव्हाचे बियाणे आणले होते. आता या काळ्या गव्हाची काढणी सुरू झाली आहे आणि काढणीच्या आधीच अनेकांनी हा काळा गहू घेण्यासाठी लाईन लावली आहे.

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड व छत्तीसगढ या ठिकाणी या गव्हाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. सलून दुकान सांभाळत त्यांनी शेतीही सांभाळली. आता अनेक शेतकरी त्यांच्या शेताला पाहण्यासाठी भेट देत आहेत.

फेसबूकवर त्यांना या गव्हाबद्दल माहिती मिळाली होती. त्यांनी शेडगे यांनी केलेल्या काळ्या गव्हाच्या शेतीबद्दल वाचले होते. नवीन काहीतरी करावे म्हणून त्यांनी काळ्या गव्हाची लागवड केली. या काळ्या गव्हाच्या लागवडीचा खर्च आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नांगरणीसाठी १५०० रूपये खर्च येतो. रोटरसाठी १००० रूपये खर्च येतो. बियाणांसाठी २१०० रूपये खर्च येतो. यामध्ये ३५ किलो बियाणांचा वापर केला गेला आहे. सरी वरबा मजूरीसाठी ९० रूपये खर्च येतो आणि खताला ६०० रूपये खर्च येतो. अशाप्रकारे तुम्ही काळ्या गव्हाची लागवड करू शकता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.