नाद करा पण आमचा कुठं! आकाशातून पडणाऱ्या दगडांना वेचून कोट्यावधी कमावतो हा व्यक्ती

आज माणूस कोणत्या माध्यमातून कमाई करेल काहीही सांगता येत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत जो आकाशातून जमिनीवर पडणाऱ्या उल्कापिंडाला जमा करून कोट्यावधी रूपये कमवत आहे.

या व्यक्तीचे नाव माईक फार्मर आहे आणि त्यांचे वय ४८ वर्षे आहे. अमेरिकेतील रहिवासी असलेला माईक हा उल्कापिंड डिलरच्या रुपाने जगभर प्रसिद्ध आहे. द सन दिलेल्या माहितीनुसार, माइक फार्मर उल्कापिंड एस्ट्रॉनॉमर्सपासून श्रीमंत लोकांना विकत देण्याचे काम करतो.

पण हे काम दिसते तेवढे सोपे नाही. अनेकदा त्याला उल्कापिंड शोधण्यासाठी स्वताचा जीव धोक्यात घालावा लागतो. त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे. माइक म्हणाले की, मला साहस करायला आवडते.

हे काम करताना मला आनंद मिळतो. त्यांना उल्कापिंडाच्या शोधात जंगल आणि निर्जनस्थळी जावे लागते. त्यांना खुप कठोर मेहनत घ्यावी लागते. त्यांना अंदाज घ्यावा लागतो की उल्कापिंड कोणत्या जागी पडणार आहे किंवा कोणत्या ठिकाणी पडला आहे.

ते उल्कापिंडाची खरेदी विक्रीही करतात. त्यांनी गोळा केलेल्या उल्कापिंडांवर बोली लागते आणि बोली लागल्यानंतर त्यांची विक्री होते. त्यांनी सांगितले की शिक्षणासाठी कर्ज घेऊन त्यांनी पहिल्यांदा उल्कापिंडाचे काही दगड खरेदी केले होते.

यावेळी माईक यांनी मोरक्कोचा दौरा केला होता. पण ज्यावेळी त्यांनी तो दगड खरेदी केला होता तेव्हा त्यांना त्या दगडाचे महत्व माहित नव्हते. त्यानंतर त्यांच्याजवळ असलेला मून रॉक तब्बल ७ कोटी ३२ लाखांना विकला गेला होता.

या पैशातून त्यांनी एक घर खरेदी केले आणि त्यांच्यावर असलेले कर्ज फेडले. त्यानंतर त्यांनी या व्यवसायात खुप प्रगती केली. आज ते जवळपास पुर्ण जगात फेमस आहेत. फक्त आकाशातून पडणाऱ्या दगडांना वेचण्याचे काम ते करतात.

महत्वाच्या बातम्या
विवाहीत व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी मधुबाला त्यांच्या मुलांचा आणि पत्नीचा खर्च उचलायला होत्या तयार
प्रवाहाच्या विरोधात जात त्याने २ एकरात केली पेरूची लागवड, १४ महिन्यांत कमावले..
कुंभमेळ्यात सहभागी झाले होते संगीतकार श्रवण अन् त्यानंतरच त्यांचा कोरोनाने मृत्यू झाला; मुलाने केला गौप्यस्फोट
कोरोना काळात चोरांचा दिलदारपणा! चिठ्ठी लिहून चोरलेल्या १७०० लसी केल्या परत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.