घराच्या छतावर सुरू केला बटेर पालनाचा व्यवसाय, आता महिन्याला कमावतोय लाखो

तुम्हाला बटेर पालन हा व्यवसाय माहित आहे का? बऱ्याच लोकांना हा व्यवसाय माहित नाही. पण आजकाल अनेक लोक याचा व्यवसाय करून लाखो रूपये कमवत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरूणाबद्दल सांगणार आहोत ज्याने बटेर पालनातून लाखो रूपये कमावले आहेत.

त्या तरूणाचे नाव आहे प्रविण वांढरे. खुप कष्टातून त्यांनी हा बटेर पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्याकडे बटेर पालनासाठी जमीनही नव्हती पण त्यांनी हिंमत न हारता आपल्या घराच्या छतावर बटेर फार्म उभारला.

त्यांनी यातून बक्कळ कमाई केली आहे आणि तरूणांना नवीन व्यवसायाची ओळख करून दिली आहे. बटेर पालनाचा व्यवसाय गेल्या तीन वर्षांपासून करत आहेत. या तीन वर्षांत त्यांनी कधी व्यवसायात नुकसान पाहिलेले नाही.

अनेकजण पोल्ट्रीचा व्यवसाय करतात पण त्यापेक्षा कमी किंमतीत जास्त नफा देणारा व्यवसाय म्हणजे बटेर फार्म व्यवसाय. प्रवीण आधी एका मल्टीनॅशनल कंपनीत मार्केटिंग विभागात कामाला होते. पण त्यांना असे वाटत होते आपला एखादा स्वताचा व्यवसाय असावा.

याच विचाराने त्यांनी बटेर फार्मचा व्यवसाय सुरू केला. शेतीशी निगडीत असलेला व्यवसाय त्यांना करायचा होता त्यामुळे त्यांनी बटेर फार्मिंगची निवड केली होती. नोकरी करत असताना त्यांनी या व्यवसायाची माहिती काढली होती.

काही दिवसांपुर्वी त्यांनी इंटरनेटवर युपीतील बटेर पालनाविषयीचा व्हिडीओ पाहिला होता तेव्हा त्यांनी ठरवले की आपण हाच व्यवसाय करायचा. पण त्यांच्याकडे शेतजमीन नव्हती. बटेर पालनासाठी शेड टाकणे आवश्यक होती.

या समस्येवर तोडगा काढत त्यांनी आपल्या घराच्या छतावरच बटेर पालनाचा व्यवसाय सुरू केला. मग त्यांनी बटेर पालनासाठी पक्षी कोठे मिळतील याचा तपास सुरू केला. महाराष्ट्रात बटेर पालन जास्त केले जात नसल्याने त्यांना अडचणी आल्या.

खुप तपास केल्यानंतर त्यांना चंद्रपुर जिल्ह्यातील राजूरा येथे एका हॅचेरीचा शोध लागला. पहिल्यांचा आणलेल्या पक्षांची त्यांनी थेट विक्री केली आणि दुसरी बॅच घेतली तेव्हा त्यांनी स्वाताची हॅचेरी सुरू करण्याचे ठरवले. सुरूवातील त्यांनी ५०० अंड्यांची हॅचेरी तयार केली. आता त्यांच्याकडे १५०० अंडी आहेत.

बटेर पक्षी संशोधन केंद्रातून बनवले जातात. त्यामुळे हे पक्षी खुप अंडी देतात. जंगली बटेरवर बंदी आहे आणि जंगली बटेर फार कमी अंडी देतात. बटेर पक्षाच्या अंड्यांची किंमत १० रूपये असते. बटेर मादी ही वयाच्या ४० व्या आणि ५० व्या दिवसाला अंडी देते.

वर्षभरात २०० ते ३०० अंडी मिळतात. बटेर पक्षाचे आयुष्य हे फक्त ३ वर्षांचे असते. दोन पक्षांची किंमत ही साधारण ३०० रूपये इतकी असते. एका पक्षाचे वजन २०० ते ३०० ग्रॅम असते. बटेरची अंडी आपल्या आरोग्यासाठी खुप लाभदायक असतात.

महत्वाच्या बातम्या
नरेंद्र मोदींना नेतृत्व कसे करावे कळत नाही, मोदीजी राजीनामा द्या; कंगणाची धक्कादायक मागणी
‘या’ हॉलीवूड अभिनेत्याने केले होते शिल्पा शेट्टीला सगळ्यांसमोर जबरदस्ती किस; प्रकरण गेले कोर्टात
साऊथ इंडस्ट्रीतील ‘या’ अभिनेत्यामूळे ५० वर्षांची तब्बू आजही आहे अविवाहीत
मोठी बातमी! राज्यातील लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवणार; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.