पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेली म्हणून पती बनला सीरियल किलर, रागाच्या भरात केले १८ खून

हैदराबाद | तेलंगनामधील हैदराबाद येथे टास्क फोर्स पोलिसांनी एका सीरिअल किलरला पकडले आहे. हा सिरिअल किलर महिलांसोबत सेक्स करायचा आणि से’क्स केल्यानंतर त्यांचा खून करायचा. त्याने आतापर्यंत १८ महिलांची हत्या केली होती.

दारूच्या नशेत तो हा कांड करायचा. त्याला दोन महिलांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती पण त्याने नंतर कबूल केले की त्याने अजून १६ खून केले आहेत. चौकशीत त्याने कबूल केले की त्याची पत्नी एका दुसऱ्या पुरूषासोबत पळून गेली होती.

यानंतर त्याला आपल्या पत्नीचा खुप राग होता त्यामुळे त्याने हे खून केले. ३० डिसेंबर २०२० ला घाटकेसर येथील अंकुशपुर येथे एका ५० वर्षीय महिलेचा खून झाला होता. या हत्येच्या आरोपाखाली पोलीसांनी ४५ वर्षीय रामुलू याला अटक केली.

त्याच्यावर याआधी एका ३५ वर्षीय महिलेच्या हत्येचाही आरोप आहे. या महिलेचा मृतदेह १० डिसेंबर २०२० ला सापडला होता. महिलांची हत्या करून तो त्यांचे किमती सामान चोरी करत असे. रामुलूने वेंकटम्मा नावाच्या महिलेला मद्य विकत आणण्याच्या बहाण्याने ताडी परिसरातून नेले.

नंतर त्या महिलेला अंकुशपुर, घाटकेसरमध्ये वेगवेगळ्या परिसरात घेऊन गेला आणि बोल्डरला धडकवून त्या महिलेची हत्या केली. याचप्रकारे त्याने दुसऱ्या महिलेला बालानगर ताडी परिसरातील एका सुनसान ठिकाणी नेले. तेव्हा ती महिला नशेत होती.

रामुलूने तिच्या साडीचा वापर करून तिचा गळा घोटला आणि तिचे चांदीचे दागिने घेऊन तो फरार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २१ वय असताना त्याचे लग्न झाले होते. त्याची पत्नी एका दुसऱ्या युवकाबरोबर पळून गेली.

त्यानंतर त्याच्या मनात महिलांबद्दल खुप राग निर्माण झाला. २००३ मध्ये तो महिलांची हत्या करू लागला. तो महिलांना पैसे देऊन से’क्स करण्यासाठी बोलवत असे मग से’क्स केल्यानंतर त्या महिलांची हत्या करत असे.

महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने आमदाराचा राजीनामा; केले ‘हे’ गंभीर आरोप
‘राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळ्या घातल्या, दिल्लीतही तेच वातावरण तयार केलं’
तब्बूच्या साड्यांना इस्त्री करत होता बॉलीवूडचा ‘हा’ दिग्दर्शक; आज एका चित्रपटासाठी घेतो करोडो रुपये
दिल्लीच्या घटनेमागे भाजपचाच हात; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केलेल्या आरोपाने उडाली खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.