बाबोव! टॉयलेट सीटवर बसताच खालून आला अजगर, पुढं जे घडलं..; पहा व्हिडीओ

बाथरूमला आली म्हणून तो घाईघाईत टॉयलेटमध्ये गेला. टॉयलेट सीटवर बसलेला असताना त्याला खालून काहीतरी टोचत आहे असे जाणवले. तेव्हा त्याने उठून टॉयलेटमध्ये डोकावून पाहिले असता त्याला धक्काच बसला. कारण टॉयलेटमध्ये चक्क भलामोठा अजगर होता.

अजगराने टॉयलेटमधून डोकं बाहेर काढलं होतं. ही घटना थायलंडमध्ये घडली आहे. ४५ वर्षीय सोमाचाईच्या घरात हा अजब प्रकार घडला. त्याच्या घरात २८ मार्चला अजगर सापडला होता. झाले असे होते की, तो टॉयलेट सीटवर बसला होता.

खालून काहीतरी लागतंय असं त्याला जाणवलं. त्यामुळे तो उठला आणि त्याने टॉयलेटच्या आत डोकावले तर त्यातून अजगरांच डोकं दिसत होता. त्या अजगराला पाहून तो इतका घाबरला की विचारूच नका. त्याला घामच फुटला.

त्याचे पाय थरथर कापू लागले, हृद्याचे ठोके वाढले. अशा अवस्थेत त्याने शेजारी असलेलं डिटेर्जेंट घेतलं आणि अजगराच्या तोंडावर फेकलं. पण अजगर काही हटायला तयार नव्हता. शेवटी तो पळत गेला आणि त्याने आपात्कालीन सेवेला फोन केला.

डेली मेलने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. त्याने सकाळीच घराबाहेर सापाला पाहिले होते. त्याने सापाला पकडण्याचा प्रयत्नही केला होता पण तो अपयशी झाला. हाच तो अजगर असावा अशी त्याला खात्री आहे. जेव्हा मी टॉयलेट सीटवर बसलो तेव्हा मला जाणवलं की खालून कोणीतरी मला ढकलत आहे.

जेव्हा मी खाली पाहिलं तर मला अजगर दिसला. अथक प्रयत्नानंतर या अजगराला पकडण्यात आलं आहे. अजगराला पकडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याला पकडल्यानंतर एका सुरक्षित स्थानी सोडून देण्यात आलं आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.