विषारी साप खाल्याने कोरोना होत नाही म्हणत त्याने खाल्ला विषारी जिवंत साप, पुढे जे घडलं..

कोरोनापासून वाचण्यासाठी लोक मास्क घालत आहेत, सॅनिटायजर लावत आहेत, काढा पित आहेत, इम्युनिटी बुस्टर फुड्स खात आहेत आणि जास्तीत जास्त वेळ आपल्या घरातच घालवत आहेत. सरकारनेही याबाबत गाईडलाईन लागू केल्या आहेत.

नागरीकांना घरात राहण्याचे आवाहन केले गेले आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. अनेक लोक कोरोनापासून वाचण्यासाठी वेगवेगळे उपाय करत आहेत. याच्या व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. पण तामिळनाडूच्या मदुरै जिल्ह्यात कोरोनापासून वाचण्यासाठी सगळ्या सीमा पार केल्या.

तुम्ही जर वाचले की त्याने काय केले आहे तर तुम्हालाही धक्का बसेल. तामिळनाडूमध्ये मदुरै जिल्ह्यात राहणाऱ्या ५० वर्षीय वदिवेलु ऍग्रीकल्चर कुली आहेत. त्यांचे म्हणणे आहे की जिवंत विषारी साप खाल्याने कोरोनाच्या बाधेपासून आपला बचाव होऊ शकतो.

ते फक्त म्हणाले असते तर कदाचित त्यांच्यावर कोणीच विश्वास नसता ठेवला पण आपली गोष्ट सिद्ध करण्यासाठी त्यांनी चक्क एक साप खाऊन दाखवला. इंटरनेटवर सध्या त्यांचा हा विचित्र व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

वदिवेलु विषारी सापाला कोरोना व्हायरसचा ऍन्टिडोट मानत आहेत. वदिवेलु यांचे नशीब चांगले होते की विषारी साप खाल्यानंतरही ते जीवंत बचावले. कारण त्यांनी सापाच्या विषारी ग्रंथीला खाल्ले नव्हते. जर त्यांनी सापाच्या विषारी ग्रंथीला चावले असते तर त्यांचा मृत्यु झाला असता.

मिळालेल्या माहितीनुसार वदिवेलू हे कृत्य करताना नशेमध्ये होते. जेव्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा त्यांना वनविभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. एवढेच नाही तर त्यांच्यावर ७ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तुम्हाला आमचा सल्ला आहे की असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या
विषारी साप खाल्याने कोरोना होत नाही म्हणत त्याने खाल्ला विषारी जिवंत साप, पुढे जे घडलं..
“उध्दव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी आणि शरद पवारांनी त्यांच्या हाताखाली काम करावं”
‘रमता जोगी’वर तीन पोरींनी केलेला हा डोळ्याचं पारण फेडणारा डान्स पाहून तुमचेही पाय थिरकतील
‘रमता जोगी’वर तीन पोरींनी केलेला हा डोळ्याचं पारण फेडणारा डान्स पाहून तुमचेही पाय थिरकतील

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.