काम न करता पठ्ठ्या घेत होत १५ वर्षे बसून पगार; पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर

अनेकांना आपल्या कामाचा मोबदला भेटत नाही, तर काही लोक आर्थिक गरजा भागण्याठी जास्तीचे काम करुन पैसे मिळवत असतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका माणसाबद्दल सांगणार आहो, जो गेल्या १५ वर्षांपासून काहीही न करता पगार होता.

इटलीच्या एका रुग्णालयाने तिथल्या कर्मचाऱ्यावर काम न करता पगार घेण्याचा आरोप लावला आहे. या कर्मचाऱ्याचे नाव सल्वाटोर स्कुमेस असे आहे.

द गार्डीयनच्या रिपोर्टनुसार, सल्वाटोरने २००५ काम करायचे बंद केले होते. पण तरीही त्याला पगार भेटत होता. त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासून त्याच्या खात्यात ५,३८,००० युरो रक्कम जमा झाली आहे, म्हणजेच ४ कोटी ८६ लाख रुपये त्याच्या बँकेत जमा झाले आहे.

सल्वाटोर कॅटेनजरो शहरात असणाऱ्या पुलगीस सियासियो रुग्णालात काम करत होता.पण ते काम त्याने २००५ मध्ये सोडले होते. पण त्याला त्याचा पगार येत होता.

त्यामुळे आता त्याच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००५ मध्ये सल्वाटोरने रुग्णालयाच्या संचालकाला धमकी दिली होती, की त्याच्या विरोधात तक्रार दाखल करु नये.

त्यानंतर त्या रुग्णालयाचे संचालक निवृत्त झाला तरीही त्याचा पगार सुरुच होता. मात्र हे प्रकरण प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रेकॉर्ड तपासला, तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

तसेच त्या कर्मचाऱ्यावर फसवणूक, बळजबरीने वसुली आणि कार्यालयाचा केलेला दुरुपयोग असे आरोप लावण्यात आले असून याबाबत आणि चौकशी सुरु आहे. तसेच अनुस्थितीत असूनही कारवाई न केल्याने रुग्णालयाच्या सहा जणांची चौकशी सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-

साजन, राजा हिंदूस्थानीसारख्या चित्रपटांना संगीत देणाऱ्या प्रसिद्ध संगीतकाराचे निधन; बाॅलीवूडवर शोककळा
कोरोना झालाय.? घाबरू नका, १०५ वर्षीय आजोबाही झालेत बरे, फक्त या गोष्टींकडे लक्ष द्या
“महाराष्ट्रात कोविड मृत्यु तांडव सुरु, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.