आकाशातून पडलेल्या दगडानं कोट्याधीश झाला मेंढपाळ, पण मोठं मन करत दान केला तो कोट्यावधीचा दगड

जगभरात अशा अनेक घटना घडत असतात, ज्याने एखादा माणूस एका झटक्यात करोडपती होऊन जातो. मग त्यामध्ये लॉटरी असो वा एखादी मौल्यवाण वस्तु. आता अशीच एक घटना पुन्हा घडली आहे.

युक्रेनच्या कॉट्सवोल्डसमध्ये घडलेल्या घटनेने सर्वांनाच हैराण करुन टाकले आहे. फेब्रुवारीमध्ये येथे मेंढ्यांना चरायला घेऊन जाणाऱ्या एका माणसाला दोन उल्कापिंडचे दोन तुकडे मिळाले होते. त्याची किंमत तब्बल १ कोटी रुपये इतकी होती.

हे उल्कापिंड मिळाल्यानंतर त्या मेंढपाळाने ते एका म्युझियमला दान केले होते. विशेष म्हणजे हे उल्कापिंड ४ बिलियन वर्षांपुर्वीचे आहे. याच्या मदतीने आवकाशात जीवन आहे की नाही याचे रहस्य उलगडू शकते.

सुरुवातीला पाहिल्यानंतर हा एक दगड वाटत होता. पण प्रत्यक्षात तो खुपच मौल्यवाण वस्तु होता. हे तुकडे गेल्य ४ बिलियन वर्षांपासून अंतराळात तरंगत होते. मात्र यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ते पृथ्वीवर पडले आहे.

मेंढपाळ जेव्हा आपल्या मेढ्यांना चरायला घेऊन जात होता. तेव्हा हा दगड दिसला तेव्हा हा साधा वाटला पण नंतर त्याला कळाले की ही उल्कापिंड आहे आणि त्याची किंमत १ कोटी रुपये इतकी आहे, पण त्याने हे दोन दगड एका म्युझियमला दान करण्याचा निर्णय घेतला. आता १७ मेपासून ते डिस्प्ले होणार आहे.

या उल्कापिंडाचे नाव winchcombe meteorite असे नाव ठेवण्यात आले आहे. हे खुप दुर्मिळ उल्कापिंड असून मागील ३० वर्षात युकेमध्ये आढलेला हा पहिला दगड आहे. हे उल्कापिंड आकाशातून कोसळल्याचे सीसीटीव्हि कॅमेऱ्यामध्ये कैद झालं होतं.

महत्वाच्या बातम्या-

मी माझ्या परिवाराला तुझ्यामुळे सोडून चालली आहे; आत्महत्येआधी अल्पवयीन मुलीचं भावूक करणारं पत्र
“तेव्हा सलमान म्हणाला, तुला कुठलीही मदत लागली तर मला सांग मग डॉक्टर असो वा पैसे मी देईल”
ही दोस्ती तुटायची न्हाय! दोन मित्रांनी आपल्या कोरोनाग्रस्त मित्रासाठी जे केलं ते पाहून सलाम ठोकाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.