…आणि एलियनसारखं दिसण्यासाठी त्याने आपले ओठ, कान, नाक कापले

आपला छंद पुर्ण करण्यासाठी माणूस कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. आणि तो छंद जर एखाद्यासारखं दिसण्यावरून असेल तर विचारूच नका. लोक काहीही करू शकतात आणि याचा तुम्ही विचारही करू शकत नाही.

ऍन्थोनी लोफ्रेड या फ्रेंच व्यक्तीने एलियनसाठी दिसण्यासाठी चक्क आपला वरचा ओठच कापून टाकला. त्याने ब्लॅक एलियन प्रकल्पाच्या माध्यमातून असाच प्रयत्न केला आहे. आणि तो एलियनसारखा दिसतो आहे.

एलियनसारखं दिसण्यासाठी त्याने आपल्या वरच्या ओठाचा भाग कापून टाकला. मात्र त्याने असं केल्यामुळे आता त्याला बोलताना त्रास जाणवत आहे. ३२ या व्यक्तीने एलियनसारखे दिसण्यासाठी पुर्ण अंगावर शाई लावली आहे.

तसेच त्याने आपले नाकही काढून टाकले आहे. तो म्हणाला की ओढाच्या वरचा भाग काढल्याने मला त्रास होत आहे पण याचा मला काहीच पश्चात्ताप नाही. त्याने आपल्या ओढांची शस्त्रक्रिया स्पेनमध्ये जाऊन केली.

कारण तो फ्रान्सचा रहिवासी आहे आणि अशा प्रकारची शस्त्रकिया फ्रान्समध्ये करण्यास बंदी आहे. त्याचा वरचा भाग काढून टाकल्याने त्याच्या नाकाखालील भाग एखाद्या गुफेसारखा दिसत आहे. त्याचे सर्व दात बाहेर दिसू लागले आहेत.

त्याला आता पहिल्यासारखे बोलता येत नाही आणि तो काय बोलतो हे समोरच्या व्यक्तीला कळण्यास अवघड जाते. त्याला आता ब्लॅक एलियन व्हायचे आहे. त्याने आपल्या पुर्ण शरीरावर टॅटू काढले आहेत. त्याने डोळ्यातदेखील टॅटू काढला आहे.

त्याने कानदेखील शस्त्रक्रिया करून काढून टाकले आहेत. आपला चेहरा एलियनसारखा दिसावा यासाठी त्याने विशिष्ट प्रकारचे त्वचारोपनही केले आहे. तो म्हणाला की तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मी जगातील सर्वात आनंदी व्यक्ती आहे.

माझ्यासारखं करण्याची कोणत्याही व्यक्तीला गरज नाही. मला भयानक पात्रांमध्ये प्रवेश करायला आवडते. मी बऱ्याचदा कुठेतरी स्थिर होतो भुमिका निभावतो. शक्यतो रात्री अंधार असलेल्या जागी मला मजा येते. मी साकारत असलेल्या भुमिकेत आणि स्वतामध्ये मी फरक शोधतो असे तो म्हणाला आहे.

महत्वाच्या बातम्या
रेणूनंतर करूणा शर्माने केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडेंचा धक्कादायक खुलासा; म्हणाले….
मुंबईकरांच्या ‘त्या’ भावनिक क्षणामुळे आनंद महिंद्राही झाले भावूक, प्रार्थना करत म्हणाले..
एक-दोन नव्हे तर तब्बल १६ तरूणांना महिलेने घातला गंडा; तपासादरम्यान पोलिसही चक्रावले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.