सलूनमध्ये गाणे ऐकताना भावाला आली गर्लफ्रेंडची आठवण, रडून रडून झाला बेहाल, पहा व्हिडीओ

आजकाल अनेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. आता त्यातील खरे कोणते आणि खोटे कोणते हे ओळखणे खुप कठीण असते. पण अशा व्हायरल व्हिडीओजमुळे आपल्या चेहऱ्यावर हसु फुटते. त्यामध्ये काही भावनिक व्हिडीओदेखील असतात.

आता प्रेमदेखील सोशल मिडीयावरच मुले व्यक्त करतात. अनेक जणांना सोशल मिडीयावर मित्र मैत्रिणी भेटतात मग त्यांना एकमेकांवर प्रेम होते. काहीवेळा ब्रेकअप होते आणि सोशल मिडीयावरच त्यांचे पॅचअपही होते. कोरोनाच्या काळात तर सोशल मिडीयाचा वापर लोकांनी खुप केला.

सध्या सोशल मिडीयावर एका दिल टुटे आशिकचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तो एका सलूनमध्ये केस कापायला गेला असताना तेथे एक गाणे वाजत असते. ते गाणे ऐकताच त्याला गर्लफ्रेंडची आठवण येते आणि तो सलूनमध्येच रडायला लागतो.

केस कापणारा न्हावीसुद्धा त्याचे रडणे पाहून केस कापायचे सोडून देतो. तेथे असलेल्या इतर व्यक्तींना त्या आशिकला पाहून हसू आवरले नाही. या व्हिडीओने सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे. सध्या सगळीकडे हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंटचा आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. तुम्ही अनेक आशिक पाहिले असतील पण या व्यक्तीसारखा आशिक पाहिला नसेल. अनेक लोक यावर कमेंट करत आहेत की, खुप वाईट प्रकारे मुलीने याला धोका दिला आहे वाटतं. आता त्याच्यासोबत काय झाले आहे देवच जाणे. पण या व्हिडीओने सध्या सोशल मिडीयावर आग लावलेली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.