Share

Mamta Kulkarni : अभिनेत्रीचे अंडरवर्ल्डसोबत कनेक्शन, टॉपलेस फोटोशूटने उडवलेली खळबळ, आता ग्लॅमर जग सोडून बनली संन्यासी

Mamta Kulkarni : 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये(Bollywood) आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ममता कुलकर्णी(Mamta Kulkarni) आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आली आहे. २० एप्रिल १९७२ रोजी जन्मलेली ममता एकेकाळी इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक मानली जात होती. पण तिच्या कारकिर्दीइतकीच, तिच्या वैयक्तिक जीवनातील वादग्रस्त गोष्टींमुळे ती कायम चर्चेचा भाग राहिली.

ममताने(Mamta Kulkarni) १९९१ मध्ये तमिळ चित्रपट ‘नानबरगल’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि पुढच्याच वर्षी ‘तिरंगा’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. ‘आशिक आवारा’, ‘वक्त हमारा है’, ‘क्रांतिवीर’, ‘करण अर्जुन’ आणि ‘बाजी’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांमधून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्या काळात ममता एका ‘सेक्स सिम्बॉल’ म्हणूनही ओळखली जात होती.

तिचं नाव अनेक वादांशीही जोडले गेलं. १९९३ मध्ये स्टारडस्ट मासिकासाठी केलेल्या टॉपलेस फोटोशूटमुळे ती मोठ्या वादात सापडली होती. या प्रकारामुळे तिला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, पण तिचं हे धाडसी पाऊल बऱ्याच चर्चेचा विषय ठरलं. ममताची स्पष्टवक्तेपणा आणि बेधडक शैली तिला इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळी ठरवत होती.

तिच्या अभिनयापेक्षा तिचं नंतरचं जीवन अधिक गूढ आणि वादग्रस्त ठरलं. रिपोर्ट्सनुसार, ममताने दुबईस्थित कुख्यात ड्रग माफिया विक्की गोस्वामीशी विवाह केला. मात्र, ममताने या विवाहाच्या बातम्यांना नेहमीच अफवा म्हणून फेटाळलं. ती अनेक वर्षे विकीसोबत दुबईत वास्तव्यास होती. या काळात तिचं नाव अंडरवर्ल्डशी जोडलं गेलं आणि ती अनेक बेकायदेशीर प्रकरणांमध्ये अडकली.

२०१६ मध्ये ममता आणि विकी गोस्वामी यांना केनिया विमानतळावर ड्रग्स तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. नंतर त्यांची सुटका झाली. तिचे संबंध छोटा राजनसारख्या डॉनशी असल्याच्याही चर्चा होत्या. अंडरवर्ल्डशी(Underworld) असलेल्या संबंधांमुळे तिला काही चित्रपट मिळाल्याचेही बोलले गेले.

आज ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) बॉलिवूडपासून(Bollywood) कोसों दूर आहे. ग्लॅमरच्या झगमगाटातून बाहेर पडून तिने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. ती आता संन्यासी बनली असून, ‘Autobiography of a Yogi’ हे पुस्तक लिहून तिने तिच्या जीवनदृष्टीचा परिचय दिला आहे. तिचा लूकही पूर्णपणे बदलला असून, चित्रपटसृष्टीतली ममता आणि आजची ममता यामध्ये मोठा फरक जाणवतो.

एकदा तिने सांगितलं होतं, “काही लोक सांसारिक कामांसाठी जन्मतात, पण मी देवासाठी जन्मले आहे.” अशा शब्दांत तिने तिच्या बदललेल्या जीवनशैलीमागचं कारण स्पष्ट केलं होतं.

एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री आणि वादग्रस्त सेलिब्रिटी आता शांततेच्या शोधात, अध्यात्माच्या मार्गावर आहे – ममता कुलकर्णीचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे.
mamta-kulkarni-actresss-connection-with-the-underworld

ताज्या बातम्या क्राईम बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now