आता ममतांचा मोर्चा दिल्लीकडे! सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करत आखली २०२४ ची रणनीती

पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला धक्का देत सत्ता कायम राखली. ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीकडे आपला मोर्चा वळवला आहे.

२०२४ मध्ये लोकसभा निवडणुका ममता बॅनर्जींना खुणावू लागल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी याच पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन विरोधकांना केले आहे. आपण २०२४ च्या युद्धात जोरदार लढा देऊ असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी आता लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी भाजपच्या विरोधात लढण्यासाठी सर्वांना प्रोत्साहीत करू शकते. पण एकटी काही करू शकत नाही. आपण एकत्र यायला हवं. यामुळे विरोधक मोदी सरकारचा घाम काढण्याची तयारी करत आहेत.

ममता यांनी पश्चिम बंगामध्ये मिळवलेल्या एकतर्फी विजय मिळवला. यामुळे त्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. यामुळे सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करत ममता बॅनर्जी यांनी २०२४ च्या युद्धासाठीही एल्गार पुकारला आहे.

बंगालमध्ये झालेली निवडणूक प्रामुख्याने भाजप विरुद्ध तृणमूल अशीच लढली गेली. त्यामुळे भाजपचा पराभव करणं शक्य असल्याची जाणीव ममता यांनाही झाली आहे. यामुळे येणाऱ्या लोकसभा चित्र वेगळे निर्माण होणार का.? याबाबत उत्सुकता लागली आहे.

मी लोकांना भाजपच्या विरोधात लढण्यासाठी प्रोत्साहीत करू शकते. पण एखादा व्यक्ती एकटा सर्वकाही करू शकत नाही. मला वाटते आपण सर्व जण मिळून २०२४ च्या युद्धात लढा देऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

पंढरपूरमध्ये होणार फेरनिवडणूक.? भाजपकडून गैरप्रकार झाल्याचा राष्ट्रवादीचा आरोप

मोदी सरकारची मोठी घोषणा; कोरोना योध्द्यांना मिळणार सरकारी नोकरीत प्राधान्य

रेमडेसीवीरचा काळाबाजार करणाऱ्या पत्रकारासह वॉर्डबॉयच्या टोळीला पोलिसांनी केली अटक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.