“कार्यक्रमाला बोलावता व अपमान करता, शोभत नाही तुम्हाला हे”; ममतांनी मोदींना तोंडावर सुनावले

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीचा कार्यक्रम पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड उपस्थित होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोरच ममता दिदी संतापल्या.

त्याचं झालं असं या कार्यक्रमात पीएम मोदी यांच्या भाषणाआधी ममता बॅनर्जी यांना मंचावर बोलावण्यात आले. तेव्हा उपस्थितांमधून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. घोषणा देणाऱ्यांना थांबवून आता मुख्यमंत्र्यांना बोलू द्या असं आवाहन करण्यात आले.

त्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “ना बोलबे ना…आमी बोलबे ना…” त्यानंतर त्या म्हणाल्या “मंचावर येत सरकारी कार्यक्रमाची एक विशिष्ट मर्यादा असली पाहिजे. हा सरकारी कार्यक्रम आहे. हा एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही.”

“हा कार्यक्रम कोलकात्यात घेतल्याबद्दल मी पंतप्रधान आणि सांस्कृतिक मंत्र्याचीं आभारी आहे. मात्र आमंत्रण देऊन असे अपमानित करणं आपल्याला शोभत नाही. मी यांच्याविरुद्ध आणखी काही बोलू इच्छित नाही असं मी तुम्हा लोकांना सांगते. जय हिंद. जय बांगला” असे म्हणून त्या जागेवर जाऊन बसल्या.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच राज्यात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकाता दौऱ्यावर येण्याच्या काही तास आधी तृणमूल काँग्रेसने पदयात्रेच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केले.

बातमी कामाची! राज्यात नोकरभरतीला सुरुवात; पाहा कोणत्या विभागात किती पदांसाठी भरती

लस घेण्यासाठी मोबाईल नंबर आधार कार्डशी करावे लागणार लिंक; वाचा सरकारचे आदेश 

‘नोटेवरील गांधींचा फोटो बदलून शिवाजी महाराजांचा लावावा’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.