पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या लहान भावाचे कोरोनामुळे निधन

कोलकाता | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. कोरोनाची लागण झाल्याने रुग्णांच्या मृत्यू होणाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भावाचं कोरोनाने निधन झालं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे लहान भाऊ असीम बॅनर्जी यांना कोरोनाची लागण झाली होती. कोलकत्यातील मेडिका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती.

अखेर आज सकाळी असीम बॅनर्जी यांची प्राणज्योत मालावली आहे. भावाच्या निधनाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राज्यातील अनेक नेत्यांनी ट्टिट करत श्रध्दांजली वाहिली आहे.

असीम बॅनर्जी यांच्यावर कोरोना नियमांचे पालन करून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मेडिका रुग्णालयाचे चेअरमन डॉ. आलोक रॉय यांनी असीम बॅनर्जी यांचा मृत्यू झाल्याची  माहिती दिली आहे.

पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे भयानक परिस्थीती निर्माण झाली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणूकानंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे.

दरम्यान आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात ३ लाख २६ हजार ०९८ रुग्ण वाढले आहेत. तर २ लाख ५३ हजार २९९ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.  आतापर्यंत २ लाख ६६ हजार २०७ रुग्णांनी प्राण गमावले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
‘या’ महिलेने सर्वात मोठा दरोडा घालत जगाला लावलाय तब्बल ९० हजार कोटींचा चुना; FBI-MI5 घेतेय तिचा शोध
सलमानच्या राधे चित्रपटाने घातला धुमाकूळ, पहिल्याच दिवशी सर्व रेकॉर्ड तोडत कमवले ‘इतके’ कोटी
ह्रदयद्रावक… ऑक्सिजन बेडवर ‘Love U जिंदगी’ गाणं ऐकत थिरकणाऱ्या ब्रेव्ह गर्लचा मृत्यू
जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी मधूबाला यांच्या चित्रपटाचे शुटींग बघितले तेव्हा ते म्हणाले..

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.