सध्या ‘द कश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी या चित्रपटाला मोठी पसंती मिळत आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाला भाजपचे सरकार असणाऱ्या पाच राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आले आहे.(mamata banerjee statemnet on the kashmir files film)
कर्नाटक, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त घोषित करण्यात आला आहे. देशातील पश्चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यांमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली होती. पश्चिम बंगालमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील मत व्यक्त केलं आहे. “हा चित्रपट कोणीही थियटरमध्ये जाऊन पाहू नये”, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, “या चित्रपटात खोटी कथा दाखवण्यात आली आहे. त्यात कोणतंही तथ्य नाही.”
काही दिवसांपासुन सोशल मीडियावर ‘झुंड’ विरुद्ध ‘द कश्मीर फाइल्स’ असा वाद सुरु आहे. या वादात दोन गट पडले आहेत. एक गट ‘झुंड’ चित्रपटाच्या बाजूने बोलत आहे, तर दुसरा गट ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या बाजूने बोलत आहे. या वादाला जातीय रंग देण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे. ‘झुंड’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी देखील या वादावर प्रतिक्रिया दिली होती.
त्यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाबाबत वक्तव्य करत या वादात उडी घेतली आहे. माध्यमांशी सवांद साधताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “कोणीही सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहण्याची गरज नाही. द्वेष आणि हिंसाचार पसरवण्यासाठी असे चित्रपट जाणीवपूर्वक बनवले जातात.”
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, “ही खोटी कथा आहे, त्यात तथ्य नाही. चित्रपट हा चित्रपट असतो आणि चित्रपट पैसे देऊन बनवले जातात. त्यामुळे अशा चित्रपटांना करमुक्त करण्यात काहीच अर्थ नाही. असे चित्रपट पाहून कोणीही बंगालमधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा परिणाम वाईट होतील”, असे देखील त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :-
इस्कॉन मंदिरावर हल्ला; २०० लोकांच्या जमावाकडून तोडफोड आणि लूटमार, अनेकजण जखमी
केवळ १ रुपया मानधन; मतदारसंघात सायकलने प्रवास, आपच्या आमदाराची होतेय देशात चर्चा
अनिल देशमुखांच्या १०० कोटी वसुली प्रकरणला वेगळं वळण, देशमुखांना मिळणार क्लीन चीट