शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे ४६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्वजण गुवाहटीमधील रेडिसन हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.(Mamata Banerjee on the field for Uddhav Thackeray?)
तृणमूल काँग्रेस पक्षाकडून गुवाहटीमधील रेडिसन हॉटेलबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलं आहे. “महाराष्ट्राचा पाॅलीटीकल ड्रामा आसाममध्ये नको, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात हाकला”, असे म्हणत तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. यावेळी भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.
तृणमूल काँग्रेस पक्षाचे १०० ते २०० कार्यकर्ते आज गुवाहटीमधील रेडिसन हॉटेलबाहेर आले. गुवाहटीमधील रेडिसन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे बंडखोर ४६ आमदार थांबले आहेत. या हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आहेत. आसाममध्ये सध्या महापूर आला असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार या ठिकाणी आलेच कसे? असा सवाल तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
आसाममधील स्थानिक मुद्द्यांकडे लक्ष देण्याऐवजी सरकार शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मदत करत आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी आसाम पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. गुवाहटीमधील रेडिसन हॉटेलबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वर्षानिवासस्थान सोडले आहे.
यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत, असे सांगितले आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
महाराष्ट्राचा पाॅलीटीकल ड्रामा आसामात नको, आमदारांना महाराष्ट्रात हाकला; गुवाहाटीत आंदोलन
‘वर्षा’ बंगला सोडल्यामुळे उद्धव ठाकरेंवर राष्ट्रवादी नाराज, अजित पवारांच्या घरी पार पडली बैठक
राकेश झुनझुनवाला: फक्त ५ हजारात सुरू केलं ४० हजार कोटींचे साम्राज्य, आता देतायत टाटांना टक्कर