ममतांनी केला मोदींचा अपमान; अर्धा तास वाट बघायला लावली अन् पाच मिनीटांत बैठक सोडली

कोलकाता | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यास चक्रीवादळाच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी पश्चिम बंगालचा दौरा केला आहे. यादरम्यान नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीसाठी तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्राधान मोदी यांना अर्धा तास वाट पाहायला लावली आहे.

पंतप्रधान यायच्या आधी मुख्यमंत्री उपस्थित असणे राजशिष्टाचारानुसार आवश्यक असताना त्याविरोधी कृती ममता यांनी केली आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांना देखील निमंत्रण दिलं गेलं आहे. ज्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी जाहीर केली आहे.

बैठकीला ममतादीदी अर्धा तास उशीरा आल्या. आल्यानंतर लगेचच २० हजार कोटींच्या नुकसानीचा अहवाल केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या हवाली केला आणि त्या लगेच बैठकीतून निघून गेल्याची माहिती मिळाली आहे.

पश्चिम बंगालामध्ये यास चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीचा आढावा बैठकीला राज्यपाल जगदीप धनखडही उपस्थित होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कृत्यामुळे राज्यपाल आणि पंतप्रधान दोघांना अर्धा तास वाट पाहावी लागली आहे. बैठकीला पोहचल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल दिला. त्यानंतर दुसऱ्या मिटिंगला जायचे असल्याचे सांगून त्या बैठकीमधून निघून गेल्या आहेत.

घडलेल्या या प्रकारानंतर राज्यपाल धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संघर्षाचा पवित्रा राज्य आणि लोकशाहीच्या हिताचा नाही. मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांचे बैठकीत भाग न घेणं संवैधानिक कायद्याच्या शासनानुरुप नाही, असं मत राज्यपाल धनखड यांनी ट्विट करत व्यक्त केले आहे.

तसेच या घटनेनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजची घटना स्तब्ध करणारी आहे. मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान या व्यक्ती नाहीत. तर त्या संस्था आहेत. दोघेही जनसेवेचा संकल्प आणि संविधानाच्या प्रती निष्ठेची शपथ घेऊन दायित्वाचं वहन करतात.

आपत्तीच्या काळात मदतीचा हात देण्यासाठी पंतप्रधान बंगालमध्ये आले. मात्र त्यांना देण्यात आलेली वागणूक योग्य नाही. त्रासदायक आहे. असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
सुशांतच्या निधनाला एक वर्ष पुर्ण होण्याच्या आधीच रियाने केली ‘ही’ पोस्ट, चाहते म्हणाले..
देवेंद्र फडणवीस ठरले सुपरहिरो; स्वीकारले १०० अनाथ मुलांचे पालकत्व
जुन्या आठवणींना उजाळा देत सचिन पिळगावकर यांनी शेअर केला लक्ष्यासोबतचा ‘तो’ फोटो

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.