ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदींना ओपन चॅलेंज देत एका गरीब रिक्षावाल्याला आमदार करून दाखवलं

नुकत्याच बंगाल विधानसभा निवडणूका पार पडल्या. त्यामध्ये तृणमुलच्या ममता बॅनर्जींना बाजी मारत बहुमत मिळवले. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण बंगालमध्ये निवडून आलेल्या नेत्यांमध्ये बरेच असे नेते आहेत जे खुप श्रीमंत आहेत.

परंतु आता एक रिक्षावाला या निवडणूकीत निवडून आल्याने पुर्ण बंगालमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतर उमेदवारांसोबत बालागढच्या उमेदवारासाठी एक सभा घेतली होती. ज्या बालागढमध्ये नरेंद्र मोदींनी सभा घेतली त्याच बालागढमध्ये ममतांनी मनोरंजन व्यापारी या रिक्षाचालकाला निवडून आणत मोदींना दिलेले चॅलेंज पुर्ण केले.

ममता बॅनर्जी यांनी त्यांना तिकीट दिले होते. ममता बॅनर्जी यांना बालागढ मतदारसंघातून आमदार असीम कुमार यांचे तिकीट रद्द केले होते आणि मनोरंजन व्यापारी या दलित नेत्याला तिकीट दिले होते. त्यांनी भाजपचे सुभाष चंद्र हलदार या उमेदवाराला ५७८४ मतांनी पाडले.

दरम्यान, मनोरंजन व्यापारी यांच्याबद्दल सांगायचे झाले तर लहानपणी त्यांची परिस्थिती बिकट होती. त्यांनी हॉटेलमध्ये भांडी घासून आपले घर चालवले होते. प्रसिद्ध साहित्यकार महाश्वेता देवी यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली होती.

त्यांनी अनेक पुस्तके लिहीली आहेत. नक्षल आंदोलनावेळी ते तुरूंगातही गेले होते. तृणमुल काँग्रेसमध्ये सामिल होण्याच्याबाबत त्यांनी सांगितले की गळ्यात गमछा घालून हिंडणाऱ्या रिक्षाचालकाची आज समाजामध्ये काहीच किंमत नसते.

त्यांना आज कोणीही विचारत नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी जेव्हा मला निवडणूकीला उभी राहण्याची ऑफर दिली तेव्हा मला ती संधी सोडायची नव्हती मी त्यांना होकार दिला. त्यानंतर ते निवडणूकीत विजयी झाले. त्यामुळे रिक्षाचालक मनोरंजन व्यापारी सध्या पुर्ण बंगालमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत.

महत्वाच्या बातम्या
एकेकाळी घरोघरी जाऊन सायकलवर विकले सामान, आज आहे ५ हजार ५२४ कोटींचा मालक
मधूचंद्राच्या रात्री नवरी म्हणाली पोट दुखतंय अन् त्यानंतर घडला धक्कादायकप्रकार
भारतात का झाला कोरोनाचा उद्रेक? WHO च्या टॉपच्या सायंटिस्टने सांगितली ‘ही’ कारणे
बोल्ड व शाॅर्ट कपड्यांवर रश्मी देसाईचा भन्नाट डान्स पाहून चाहते घायाळ; पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.