मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गंभीर जखमी, विरोधकांनी हल्ला केल्याचा आरोप

मुंबई | पश्चिम बंगालच्या नंदीग्राम भागात निवडणुक प्रचारासाठी पोहचलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पायाला गंभीर गंभीर दुखापत झाली आहे. याशिवाय त्यांना श्वास घेण्यात अडथळे येत आहेत. दरम्यान हा अपघात नसून विरोधकांनी जाणूनबुजून केलेला हल्ला असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

बुधवारी काही जणांनी ममता बॅनर्जी यांना अचानक धक्काबुकी केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ममता यांचा उजवा पाय सूजला असून पायाच्या तळव्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या गळा आणि मनगटावर खरचटल्याच्या खुणा आहेत. तसेच त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशात घडलेल्या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

हा हल्ला सुनियोजित असल्याचा आरोप ममतांनी केला आहे. गर्दीत अचानक काही लोकांनी आपल्यावर हल्ला केला. आपल्याला गाडीत ढकलून दिलं आणि त्यानंतर त्यांनी जबरदस्तीनं गाडीचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आपल्यासोबत एकही सुरक्षारक्षक नव्हता, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
“अंबानीच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून भाजपनेच ते षडयंत्र रचलं”
दुर्देवी! आईची सरपंच पदी निवड झाली, अन् विजयी मिरवणूकीतच लेकाने सोडला प्राण
फडणवीस जोमात महाविकास आघाडी कोमात! महाविकास आघाडीच्या आणखी एका मंत्र्याला दणका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.