पुरूषांपेक्षा महिलेसोबत इंटीमेट सीन करणे सोपे आहे, मल्लिका शेरावतचे या अभिनेत्रीसोबत इंटीमेट सीन

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत आजकाल खुप चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेब सीरिज ‘नकाब’ मध्ये ती दिसली आहे. या वेब सीरिजमध्ये तिने अभिनेत्री ईशा गुप्तासोबत काही इंटिमेट सीन केले आहेत. या दृश्यांबद्दल मल्लिका म्हणाली की तिचे मत आहे की पुरुष सह अभिनेत्यापेक्षा स्त्रीबरोबर हे करणे सोपे आहे.

मुलाखतीदरम्यान, मल्लिकाने तिच्या सह-अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीनचा अनुभव सांगितला. मल्लिकाने तिच्या ‘ख्वाइश’ चित्रपटात पुरुष सह अभिनेत्यासोबत 17 किस केले होते. पण तिला हेच सीन एका स्त्रीबरोबर करताना सोपे वाटतात असे ती म्हणाली.

मल्लिका शेरावत स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “एका महिलेशी जवळीक साधणे मुळीच अवघड नव्हते. पुरूषाशी जवळीक साधण्यापेक्षा नक्कीच ते सोपे आहे. मल्लिका तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते आणि तिला तिच्या अभिनयासाठी आणि पात्रांसाठी वारंवार टीकेला सामोरे जावे लागते.

मल्लिकाने 2003 मध्ये ‘ख्वाहिश’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात 17 किसिंग सीन देण्यात आले होते. ‘मर्डर’ सारख्या चित्रपटातील जबरदस्त बोल्ड दृश्याबद्दलही अभिनेत्री चर्चेत होती. तिच्या बोल्डनेसच्या अदांवर अनेक लोक फिदा होते पण तिच्या या बोल्डनेसमुळे तिला अनेक लोकांची टीका सहन करावी लागते.

‘नाकाब’ ही वेब सिरीज 26 वर्षीय अभिनेत्रीच्या आत्महत्येभोवती फिरते, ज्यामुळे देशभरात अशांतता निर्माण होते. जिथे पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि रहस्यमय आत्महत्या आणि संशयित हत्येमागे गुन्हेगार शोधण्याचे काम करतात. त्याचवेळी आणखी एक हाय प्रोफाईल व्यक्ती या प्रकरणात अडकते आणि या केसला नवीन वळण येते.

या प्रकरणी जोहरा मेहरा (मल्लिका) संशयास्पद आरोपी असते. सत्य शोधण्यासाठी पोलीस अधिकारी अदिती आमरे काहीही करायला तयार होतात अशी या वेब सिरीजची कथा आहे. क्राईमवर आधारित ही वेब सिरीज आहे. प्रेक्षकांना नक्कीच ही वेब सिरीज आवडेल असे मल्लिकाचे मत आहे.

महत्वाच्या बातम्या
फेसबूकवर रोपे विकून या महिलेने कमावलेत महिन्याला लाखो रूपये, एका छोट्या टेरेसवर फुलवली बाग
भिजण्यापासून वाचण्यासाठी वडिलांनी मुलाच्या डोक्यावर धरली छत्री; एसटीच्या दुरूवस्थेची निघाली लक्तरे
तुमच्यात हिंमत असेल तर ‘त्या’ बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढा; राजू शेट्टींचे किरीट सोमय्यांना ओपन चॅलेंज
भाजपला सर्वात मोठे खिंडार! तब्बल ११ भाजप नगरसेवकांनी केला शिवसेनेत प्रवेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.