दिग्दर्शकाच्या ‘त्या’ घाणेरड्या मागणीला कंटाळून मल्लिका शेरावतने सोडली होती फिल्म इंडस्ट्री

२००४ मध्ये महेश भट्टचा मर्डर चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये इम्रान हाशमिसोबत मल्लिका शेरावत मुख्य भुमिकेत झळकली होती. या चित्रपटानंतर मल्लिका रातोरात सुपरस्टार झूली होती. ती बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सामील झाली होती.

मर्डर चित्रपटानंतर मल्लिकाला ग्लॅमर्स आणि हॉट अभिनेत्रींमध्ये गणले जात होते. तिची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. पण तिचे हे यश जास्त काळ टिकू शकली नाही. काही वर्षांमध्येच मल्लिका शेरावत बॉलीवूडमधून गायब झाली होती.

असे बोलले जात होते की, फिल्म इंडस्ट्रीतील काही लोकांमूळे तिने बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. बॉलीवूड सोडल्यानंतर मल्लिका हॉलीवूडमध्ये गेली होती. पण तिथेही तिला काही खास यश मिळाले नाही. त्यानंतर ती परत एकदा बॉलीवूडमध्ये आली आहे. सध्या ती अनेक वेबसीरीजमध्ये काम करत आहे.

मल्लिका एका मुलाखतीमध्ये म्हणाली होती की, पहील्या चित्रपटानंतर मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये हॉट गर्ल म्हणून ओळख निर्माण झाली होती. लोकांनी मला भरभरुन प्रेम दिले. त्याबद्दल मी त्यांची खुप आभारी आहे. लोकांच्या प्रेमामूळेच एवढे नाव बनवू शकले.

पण फिल्म इंडस्ट्रीतील लोकांनी मात्र माझे करिअर खराब केले. माझ्या पहील्या चित्रपटामध्ये मी बोल्ड भुमिका निभावली होती. कारण ती स्क्रिप्टची गरज होती. पण त्या चित्रपटानंतर मात्र सगळ्यांनी बोल्ड भुमिकांच्या ऑफर दिल्या. माझ्या शरीराला बघून मला चित्रपटांमध्ये घेतले जात होते.

दिग्दर्शकांना वाटत होते की, मी माझ्या प्रत्येक चित्रपटामध्ये छोटे कपडे घालावेत. अनेक बोल्ड सीन्स द्यावेत. एवढेच नाही तर मी दिग्दर्शकांची मागणी पुर्ण करावी. मी ह्या गोष्टीला करायला नकार दिला. तर मला चित्रपटांमधून काढून टाकण्यात यायचे. या गोष्टींचा मला कंटाळा आला होता. म्हणून मी बॉलीवूड सोडले होते.

मल्लिका शरावत बॉलीवूडमध्ये परत आली आहे. ती तिच्या नवीन वेबसीरीजमध्ये काम करत आहे. त्यासोबतच ती आत्ता फिल्म इंडस्ट्तील वाईट गोष्टींवर बोलत आहे. करिअरच्या सुरुवातील तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यानंतर मात्र अचानक इंडस्ट्रीमधून गायब झाली होती.

महत्वाच्या बातम्या –

इशा केसकरच्या बिकनीतील फोटोंनी सोशल मिडीयावर घातला धुमाकूळ; पहा फोटो

पुण्यामध्ये पारंपारिक पद्धतीने सिध्दार्थ आणि मितालीचा विवाहसोहळा पडला पार; बघा लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ

इंग्रजी येत नाही म्हणून मुलाखत सोडून पळून आला होता ‘हा’ अभिनेता; आज आहे सुपरस्टार

तेव्हा बाळासाहेब अमिताभला म्हणाले, मी बघतोच कोण तुमचा चित्रपट रिलीज होऊ देत नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.